Afghanistan airstrike on Islamabad military camp Saam TV marathi
देश विदेश

Pakistan Air Strike : पाकिस्तानवर दिवसाढवळ्या एअरस्ट्राइक; अफगाणिस्तानचा लष्कराच्या तळावर हल्ला, बराकी केल्या उद्ध्वस्त

latest Pakistan Afghanistan war updates 2026 : पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील संघर्ष तीव्र होत असून इस्लामाबादमधील लष्करी छावणीवर एअरस्ट्राइक केल्याचा दावा अफगाणिस्तानने केला आहे. या घडामोडींमुळे दोन्ही देशांतील युद्धजन्य परिस्थिती अधिकच गंभीर झाली आहे.

Namdeo Kumbhar

Afghanistan airstrike on Islamabad military camp : पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये आता युद्धाचे सावट दिसत आहे. मागली काही तासांपासून दोन देशांमधील संघर्ष अतिशय तीव्र झाला आहे. मध्यरात्री अफगाणिस्तानावर पाकिस्तानने एअरस्ट्राइक केला होता. पाकिस्तानच्या हल्ल्याला अफगाणिस्तानकडून प्रत्युत्तर दिले आहे. सकाळी ११ वाजता अफगाणिस्तानने पाकिस्तानमधील इस्लामाबादमध्ये असणाऱ्या आर्मी कॅम्पवर एअरस्ट्राईक कऱण्यात आला. या हल्ल्यात आर्मीच्या अनेक बॅरेक्स उद्ध्वस्त झाल्याचा दावा अफगाणिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाकडून कऱण्यात आला आहे.

पाकिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाकडून अफगाणिस्तानविरोधात खुलं युद्धाचे आव्हान दिले आहे. पाकिस्तानने अफगाणिस्तानच्या अनेक शहरांवर हल्ला केला. यामध्ये १३० तालिबानी सैन्यांना मारल्याचा दावा पाकिस्तानने केला होता. तर पाकिस्तानवर केलेल्या हल्ल्यात ६० पाक सैन्यांना मारल्याचा दावा अफगाणिस्तानकडून करण्यात आला होता. त्याशिवाय १५ पाकिस्तानी चौक्यांवर कब्जा केल्याचाही दावा अफगाणिस्तानच्या मंत्र्यांकडून करण्यात आला होता. मध्यरात्रीच्या हल्ल्यानंतर आज सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास अफगाणिस्तानने पाकिस्तानच्या मिलिट्री कॅम्पला लक्ष करण्यात आले. पाकिस्तानी लष्कराला उघड आव्हान देत अफगाणिस्तानने पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादवर एअर स्ट्राइक केला. या हल्ल्याला अफगाणिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाने दुजोरा दिलाय.

अफगाणिस्तानने आता पाकिस्तानमधील शहरांवर हल्ला करण्यास सुरूवात करण्यात आली आहे. सकाळी ११ वाजता केलेल्या एअरस्ट्राइकबाबत अफगाणिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाकडून अधिकृत माहिती देण्यात आली. ते म्हणाले की, अफगाण हवाई दलाने आज सकाळी ११ वाजता इस्लामाबादमध्ये एअरस्ट्राइक केला. इस्लामाबादमधील फैजाबाद येथील लष्करी मिलिट्री कॅम्प, खैबर पख्तूनख्वा, नौशेरा येथील लष्करी बॅरेक आणि जमरुदमधील लष्करी स्थळावर हल्ला करण्यात आला.

स्थानिक मिडिया रिपोर्ट्सनुसार, अफगाणिस्तानच्या हवाई दलाकडून पाकिस्तानमधील लष्करी स्थळे, केंद्रे आणि सुविधांना लक्ष्य करण्यात आले. गुरूवारी रात्री काबूल, कंधार आणि पक्तिया येथे पाकिस्तानकडून एअरस्ट्राइक करण्यात आला होता. पाकिस्तानच्या हवाई हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून अफगाणिस्तानकडून सकाळी ११ वाजता हल्ला केला. फैजाबाद, नौशेरा कॅन्ट, जमरुद मिलिटरी कॉलनी आणि अबोटाबादजवळील लष्करी छावणीला लक्ष्य करून हे हल्ले करण्यात आले. या हल्ल्यात अफगाणिस्ताकडून ड्रोनचाही वापर करण्यात आला आहे. पाकिस्तानकडून अद्याप या हल्ल्याबाबत कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: जळगावात महापालिकेच्या प्रवेशद्वारासह नागरिकांसह भाजपच्या विद्यमान नगरसेवकांचं ठिय्या आंदोलन

Weight Loss Tips: घरीच वजन कमी करण्यासाठी काय करावे?

SSC Exam: बीडमध्ये दहावीचा पेपर फुटला! उत्तरपत्रिका थेट शिक्षकाच्या व्हॉट्सअ‍ॅपवर

अजितदादांचा अपघात धुक्याने की धोक्यानं? राज ठाकरेंचा सवाल

Pune : लग्नाच्या तीन महिन्यानंतर महिलेने संपवलं आयुष्य, सुसाईड नोटमध्ये धक्कादायक कारण

SCROLL FOR NEXT