Helicopter, Yogi Adityanath
Helicopter, Yogi Adityanath  saam tv
देश विदेश

योगी आदित्यनाथांच्या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग; घटनेनंतर लखनौला रवाना

साम न्यूज नेटवर्क

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Uttar Pradesh Chief Minister Yogi Adityanath) यांचे हेलिकॉप्टरला (helicopter) आज (रविवार) पक्षी धडकल्याने हेलिकाॅप्टर तातडीने जमिनीवर उतरविण्यात आल्याची माहिती स्थानिक अधिका-यांनी दिली. या वृत्तास पीटीआयने देखील दुजाेरा दिला आहे. मुख्यमंत्री याेगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) हे सुखरुप आहेत. (Yogi Adityanath Latest Marathi News)

मुख्यमंत्री याेगी आदित्यनाथ हे शनिवारी वाराणसीत होते. त्यांनी वाराणसीत विविध खात्यांच्या आढावा बैठका घेतल्या हाेत्या. त्यानंतर त्यांनी काशी विश्वनाथ मंदिरात (Kashi Vishwanath temple) जाऊन देवदेवतांचे दर्शन घेतले होते.

वाराणसी येथून लखनौसाठी (Lucknow) उड्डाण घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरला पक्षी धडकला, त्यामुळे हेलिकॉप्टरला पुन्हा जमिनीवर उतरावे लागले,” असे जिल्हाधिकारी कौशलराज शर्मा यांनी माध्यमांना सांगितले. आज सकाळी हेलिकॉप्टरने पोलीस लाईनमधून लखनौसाठी टेकऑफ केल्यावर सुमारे 1500 फूट वर गेले असता हेलिकॉप्टरच्या काचेवर पक्षी आदळला. त्यामुळे खबरदारी म्हणून हेलिकॉप्टर पोलीस लाईनमध्ये उतरवण्यात आले. या घटनेत कोणत्याही प्रकारचे नुकसान झालेले नाही. खबरदारी म्हणून हेलिकॉप्टर उतरवण्यात आले. यानंतर मुख्यमंत्री रस्त्याने बाबपूर विमानतळाकडे रवाना झाले. येथून सरकारी विमानाने लखनौला गेले आहेत. मुख्यमंत्री दोन दिवसांच्या वाराणसी दौऱ्यावर आले होते असे जिल्हाधिकारी शर्मा यांनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mohan Bhagwat : समाजात जोपर्यंत विषमता आहे, तोपर्यंत आरक्षण असलं पाहिजे : मोहन भागवत

Nagpur Crime: नागपुरात स्पा सेंटरच्या नावाखाली 'नको ते धंदे'; पोलिसांकडून परराज्यातील ३ महिलांची सुटका

Salary Hike 2024 : यंदा नोकरदारांच्या पगारात होणार भरघोस वाढ! किती वाढणार तुमची सॅलरी?

Kalyan Murbad Railway Line: कल्याण मुरबाड रेल्वेच्या भूसंपादनाला शेतक-यांचा विरोध, पाेलिसांच्या मध्यस्थीनंतर आंदाेलन शमले

Herbal Tea पिणं आरोग्यासाठी लाभदायी

SCROLL FOR NEXT