Aditya Thackeray Meets Arvind Kejriwal Saam TV
देश विदेश

Aditya Thackeray Meets Arvind Kejriwal : कर्नाटक निवडणुकीनंतर दिल्लीत खलबतं, आदित्य ठाकरे केजरीवालांच्या भेटीला; राज्यात मोठ्या बदलांचे संकेत

Maharashtra Politics : कर्नाटक निवडणुकीनंतर दिल्लीत खलबतं, आदित्य ठाकरे केजरीवालांच्या भेटीला; राज्यात मोठ्या बदलांचे संकेत

Satish Kengar

Aditya Thackeray Meets Arvind Kejriwal : ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी रविवारी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली आहे. त्यांनी सध्याच्या राजकीय घडामोडींवर चर्चा केली. दोन्ही नेत्यांच्या भेटीनंतर राजकीय चर्चांना उद्धण आलं आहे.

या दोन्ही नेत्यांमधील भेटीचं नेमकं कारण काय? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. राज्यात आम आदमी पक्ष आणि ठाकरे गट एकत्र येणार का? अशी शक्यताही काही राजकीय तज्ज्ञांनी वर्तवली आहे.

Aditya Thackeray Meets Arvind Kejriwal : केजरीवाल यांनी केलं ट्वीट

अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्या भेटीचे फोटो ट्विटरवर पोस्ट केले आहेत. त्यांनी ट्वीट करत लिहिलं आहे की, ''मला आज माझ्या निवासस्थानी आदित्य ठाकरे यांची मेजवानी करण्याची संधी मिळाली. सध्याच्या राजकीय घडामोडींवर मी त्यांच्याशी सविस्तर संवाद साधला.'' या बैठकीला आदित्य ठाकरेंसोबत ठाकरे गटाच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी आणि आपचे खासदार संजय सिंह उपस्थित होते.  (Latest Marathi News)

Aditya Thackeray Meets Arvind Kejriwal : कर्नाटक निवडणुकीच्या निकालानंतर अवघ्या एक दिवसानंतर झाली भेट

कर्नाटकात काँग्रेसने दणदणीत विजय मिळवला आहे. याच्या एका दिवसानंतर दोन्ही नेत्यांची भेट झाली. या बैठकीतून अनेक अर्थ काढले जात आहेत. महाराष्ट्रात पंजाबी मतदारांची संख्याही बऱ्यापैकी असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे महाराष्ट्रात अरविंद केजरीवाल यांची ठाकरे गटाला मदत होऊ शकते, असं बोललं जात आहे. मात्र या भेटीमागचं खरं कारण अद्याप समोर आलेलं नाही.

Sanjay Raut on Pm Modi : मोदी लाट संपली, आता देशभरात आमची लाट सुरू झाली: संजय राऊत

दरम्यान, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले आहेत की, ''मोदी लाट संपली आणि आता आमची लाट देशभर येत आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीची तयारी आतापासूनच सुरू झाली असून आज शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक बोलावण्यात आली असून या बैठकीत 2024 च्या निवडणुकीबाबत चर्चा करून तयारीला सुरुवात होणार आहे.''

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : लाडक्या बाप्पाला निरोप देताना लहान मुलांना अश्रू अनावर

Sahara India Scam : सहारा इंडियाच्या विरोधात ईडीची मोठी कारवाई; सुब्रतो रॉय यांच्या पत्नी, मुलांच्या अडचणीत वाढ

Zakir Khan: 'प्रकरण हाताबाहेर जाण्यापूर्वी...' झाकीर खानने केली मोठी घोषणा, स्टेज शोमधून घेणार ब्रेक

नाशिकमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीत शिवतांडव नृत्य ठरले विशेष आकर्षण|VIDEO

IPS अंजना कृष्णा प्रकरणात मिटकरींचा यू-टर्न; आधी चौकशीची मागणी,आता दिलगिरी

SCROLL FOR NEXT