Madhya Pradesh 4 IPS Officers Transfer saam tv
देश विदेश

4 IPS अधिकऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या! पोलीस महासंचालकांना दिली मोठी जबाबदारी; प्रशासनात खळबळ

Four IPS Officers Get New Postings And Additional Charges: मध्यप्रदेश सरकारच्या गृह विभागाने चार वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या पदस्थापना आणि अतिरिक्त कार्यभाराबाबत आदेश जारी केले.

Omkar Sonawane

मध्यप्रदेश सरकारच्या गृह विभागाने शनिवारी पोलीस विभागातील (IPS) अधिकाऱ्यांच्या नवीन पदस्थापना आणि अतिरिक्त कार्यभाराचे आदेश जारी केले आहेत. या आदेशानुसार 1995 बॅचचे IPS अधिकारी चंचल शेखर यांची संचालक, क्रीडा आणि युवक कल्याण विभागाच्या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या चंचल शेखर हे अतिरिक्त पोलीस महासंचालक, विशेष सशस्त्र दल तसेच अतिरिक्त पोलीस महासंचालक, राज्य औद्योगिक सुरक्षा दलाचा अतिरिक्त कार्यभार सांभाळत होते. पुढील आदेशापर्यंत त्यांच्याकडे ही नवीन जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

दरम्यान, 1998 बॅचचे IPS अधिकारी अंशुमन यादव यांच्याकडे अतिरिक्त पोलीस महासंचालक, गुप्तवार्ता आणि अतिरिक्त पोलीस महासंचालक, सायबरचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. त्यांच्याकडून क्रीडा आणि युवक कल्याण विभागाकडून परत घेत त्यांना ही जबाबदारी देण्यात आली आहे. 1993 बॅचचे IPS अधिकारी अनिल कुमार हे विशेष पोलीस महासंचालक, महिला सुरक्षा या पदावर कायम राहणार आहेत. त्यांच्या विद्यमान जबाबदारीसोबतच त्यांच्याकडे विशेष पोलीस महासंचालक, अजाकचा अतिरिक्त प्रभारही सोपवण्यात आला आहे.

1997 बॅचचे IPS अधिकारी डी. श्रीनिवास वर्मा सध्या अतिरिक्त पोलीस महासंचालक, नार्कोटिक्स आणि अतिरिक्त पोलीस महासंचालक, एसटीएफचा अतिरिक्त काम सांभाळत आहेत. आता त्यांच्याकडे असेलेल्या जबाबदाऱ्यांसोबतच अतिरिक्त पोलीस महासंचालक, विशेष सशस्त्र दल आणि अतिरिक्त पोलीस महासंचालक, राज्य औद्योगिक सुरक्षा दलाचा अतिरिक्त प्रभारही सोपवण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Truck Fire: राष्ट्रीय महामार्गावर धावत्या खाद्यतेलाच्या ट्रकला भीषण आग, वाहतूक विस्कळीत

जिंकलात तर यंत्रणा प्रामाणिक अन् हरलात तर फेरफार कशी? निवडणूक आयोगाच्या समर्थनार्थ १२४ IAS अधिकारी मैदानात

Blood Sugar Control Tips: ब्लड शुगर कमी करण्यासाठी दररोज किती वेळ चालावे? जाणून घ्या नियमित चालण्याचे सोपे नियम

Bay Leaf Water For Kidney Stones: किडनी स्टोनवर तेजपत्याच्या पाण्याचा घरगुती उपाय, एकदा नक्की करून पाहा

Saree Designs: महिलांनी नऊरात्रीत नेसा 9 प्रकारच्या 9 साड्या, लेटेस्ट डिझाईन्स पाहा

SCROLL FOR NEXT