मंगळुरू : वाहतुकीचे ठरवून दिलेल्या नियमाप्रमाणे पालन करणे आवश्यक असते. पण बरेच लोक स्टंट दाखवण्यासाठी, स्टाईल मारण्यासाठी कशीही गाडी चालवतात आणि अपघाताला आमंत्रण देऊन बसतात. अशाच एका भयंकर अपघाताचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video On Social Media) होतो आहे. ज्यात भरधाव दुचाकी चालवताना तरुण अपघाला थोडक्यात बचावला आहे. या तरुणाने मृत्यूलाही चकवा दिला आहे. त्यामुळे याचं नशीब बलवत्तर म्हणून तो बचावला असंच म्हणावं लागेल.
वृत्तानुसार, कर्नाटकच्या मंगळुरूतील ही घटना आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओत दिसून आल्या प्रमाणे, बस यू-टर्न घेत होती. त्याचवेळी एक तरुण सुसाट स्कूटर चालवल येत असतो. आपल्या समोर बस टर्न घेत आहे हे पाहूनही कसलीच पर्वा करता तो गाडी चालवत राहिला. बसच्या जवळून जातानाही त्याने ब्रेक तर मारलाच नाही ना गाडीचा वेगही कमी केला नाही.
व्हिडीओ पाहिला तर त्या क्षणी वाटतं की हा तरुण काही आता धडकणार. पण यानंतर पुढे जे घडलं ते धक्कादायक आहे.
व्हिडीओत दिसून येत आहे की, स्कूटर बसच्या अगदी जवळ आली, तसा तरुणाने आपला बचाव करण्याचा प्रयत्न केला आणि स्कूटर फिश प्रोसेसिंग युनिटला धडकली आणि त्यानंतर एक झाड आणि त्याच्या समोरील दुकानाच्या मध्ये असलेल्या अगदी छोट्याशा जागेतून तरुणाने गाडी काढली. पण स्कूटरचा वेग मात्र जराही कमी झाला नाही. ती स्कूटरही पडली नाही आणि तरुणाला साधे खरचटले देखील नाही.
अपघाताची ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. त्यामुळे हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. मंगळुरू सिटी ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आलेला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.