Accident News Saam Tv
देश विदेश

Accident : मध्यरात्री भीषण अपघात, कार थेट ट्रकमध्ये घुसली, ४ डॉक्टरांचा जागेवरच मृत्यू

Uttar Pradesh Accident Doctor Death News : अमरोहा राष्ट्रीय महामार्ग ९ वर भीषण अपघात झाला असून भरधाव कार ट्रकला धडकून ४ डॉक्टरांचा जागीच मृत्यू झाला. पोलिस तपास सुरू आहे.

Alisha Khedekar

  • अमरोहातील NH-9 वर भरधाव कार DCM ला धडकली

  • ४ वैद्यकीय विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू

  • सर्व जण श्री वेंकटेश्वर विद्यापीठाचे विद्यार्थी

  • पोलिस तपास सुरू, DCM चालक फरार

उत्तर प्रदेशातून धक्कदायक बातमी समोर आली आहे. अमरोहा येथील राष्ट्रीय महामार्ग ९ वर एक भीषण अपघात झाला. या दुर्दैवी अपघातात ४ डॉक्टरांचा मृत्यू झाला आहे. मेरठहून गाझियाबादला परत येताना ४ वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या डॉक्टरांची भरधाव कार ट्रकला आदळल्याने हा अपघात झाल्याचे म्हटले जात आहे. हा अपघात रजबपूर आणि अत्रासी दरम्यान घडला असून या घटनेचा पोलीस तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, अपघातात मृत झालेले चारही डॉक्टर एकाच विद्यापीठातले होते. ते मेरठहून गाझियाबादला परतत होते. यादरम्यान अमरोहा जिल्ह्यातील राजबपूर पोलीस स्टेशन परिसरात रात्री १० वाजताच्या सुमारास एका भरधाव कारने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या डीसीएमला धडक दिली.

ही धडक इतकी भीषण होती की कारचा चक्काचूर झाला. या दुर्दैवी अपघातात कारमध्ये बसलेल्या चार तरुणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये चारही जण राजबपूर पोलीस स्टेशन परिसरातील श्री वेंकटेश्वर विद्यापीठाचे वैद्यकीय विद्यार्थी असल्याचे सांगितले जात आहे. शिवाय या अपघातानंतर डीसीएम चालक घटनास्थळावरून पळून गेला. या घटनेची माहिती मिळताच पोलिस पथक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी कारमध्ये अडकलेले मृतदेह बाहेर काढले. हे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत.

शिवाय अपघातग्रस्त वाहनांना क्रेनच्या सहाय्याने बाजूला करण्यात आले आहे. या अपघाताचे मूळ कारण अद्याप समोर आले नसून हा अपघात भीषण असून पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या गाड्यांची धडक होऊन अपघात होण्याची ही पहिलीच घटना नाही. यापूर्वीही असा प्रकार अनेक वेळा घडला आहे. रस्त्याच्या कडेला गाड्या पार्क करणाऱ्यांवरही पोलिस कारवाई करतात, परंतु अशा घटना कमी होताना दिसत नाहीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Air Force Plane Crash: मोठी दुर्घटना! 110 सैनिकांना घेऊन जाणारं हवाई दलाचं विमान क्रॅश, उड्डाण घेताच जमिनीवर कोसळलं

Dhurandhar-2: चित्रपटातील एका सीनचं शुटिंग संपल्यानंतर हमजा, रहमान डैकेतसह मेजर इक्बालही ढसाढसा रडला, काय आहे कारण?

Vasant More: वसंत मोरे यांच्यावर अटकेची टांगती तलवार; न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळला,काय आहे प्रकरण?

Maharashtra Live News Update: राज्यसभेच्या निवडणुकीत शरद पवार यांची बिनविरोध निवड

साताऱ्यात लोकशाहीची पायमल्ली; जिल्हा परिषद निवडणुकीत हायव्होल्टेज राडा

SCROLL FOR NEXT