CCTV Footage Saam Tv
देश विदेश

CCTV Footage : धुक्याचा कहर; ट्रकने तरुणाला चिरडलं, धक्कादायक VIDEO आला समोर

Accident CCTV Footage : शमीम खान असे मृत तरुणाचं नाव आहे. एका पेट्रोल पंपाबाहेर ही घटना घडली आहे. पेट्रोल पंपाजवळ लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीमध्ये हा व्हिडिओ कैद झाला आहे.

प्रविण वाकचौरे

Uttar Pradesh Accident News :

उत्तर प्रदेशातील उन्नावमध्ये एका तरुणाला ट्रकने चिरडल्याची घटना समोर आली आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही घटना कैद झाली आहे. दाट धुक्यामुळे ट्रक चालकाला रस्त्यावरील तरुण दिसला नसल्याने हा अपघात झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

शमीम खान असे मृत तरुणाचं नाव आहे. एका पेट्रोल पंपाबाहेर ही घटना घडली आहे. पेट्रोल पंपाजवळ लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीमध्ये हा व्हिडिओ कैद झाला आहे.  (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

उत्तर भारतात कडाक्याची थंडी आहे. या थंडीमुळे धुक्याचं प्रमाणही वाढलं आहे. धुक्यामुळे दृश्यमानता कमी असल्यानेच हा अपघात झाल्याचं समोर येत आहे. व्हिडीओत दिसत आहे की दोन जण रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करत होते.

एका व्यक्तीने ट्रक पाहिल्यावर थांबून घेतलं. मात्र एकजण पुढे चालत गेला. रस्त्याच्या मधोमध असताना ट्रकने त्याला धडक दिली आणि त्यानंतर ट्रकखाली येऊन तो चिरडला गेला. (Accident News)

लोकांनी तातडीने घटनास्थळाकडे धाव घेतली आणि तरुणाला ट्रकखालून खेचून बाहेर काढलं. त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेची आज निवडणूक, अध्यक्षपदासाठी भाजपचे राहुल लोणीकर यांच नाव चर्चेत

बनावट CBI चा मुंबई पोलिसांकडून भांडाफोड; सराफा व्यावसायिकांना लुटणाऱ्या आंतरराज्यीय टोळी जेरबंद

Pune Accident : पुणे-नाशिक महामार्गावर ३ वाहनांचा भीषण अपघात; कारचा चक्काचूर अन्...

Panner Chilli Recipe: घरच्या घरी बनवा स्ट्रीट फूडस्टाईल टेस्टी पनीर चिली, वाचा सोपी रेसिपी

Rain Alert : राज्यावर अल निनोचं संकट! कोकण-घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा; रायगड, पुणे घाटमाथ्याला ऑरेंज अलर्ट

SCROLL FOR NEXT