Chhattisgarh Latest news  Saam tv
देश विदेश

Chhattisgarh Latest news : छत्तीसगडच्या अबुझमाड जंगलात जोरदार धुमश्चक्री; जवानांनी ४ नक्षलवाद्यांना शोधून टिपलं!

Chhattisgarh Naxalite Encounter : अबुझमाड जंगलात या दोन्ही बाजूने सुरु झालेल्या चकमकीत एसटीएफच्या पथकाला मोठं यश मिळालं. या गोळीबारात ४ नक्षलवादी मारले गेले आहेत.

Vishal Gangurde

छत्तीसगड : नारायण जिल्ह्यात नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाल्याची माहिती समोर आली आहे. या जिल्ह्यातील अबुझमाड जंगलात मंगळवारी सकाळी भारतीय जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. या दोन्ही बाजूने सुरु झालेल्या चकमकीत एसटीएफच्या पथकाला मोठं यश मिळालं. या गोळीबारात ४ नक्षलवादी मारले गेले आहेत.

जंगलातील लपलेल्या अनेक नक्षलवाद्यांना घेरण्यात आल्याची माहिती हाती आली आहे. या भागात नक्षली आणि एसटीएफ जवानांमध्ये चकमक सुरु आहे.

सोमवारी एकाचा खात्मा

सोमवारी सुकमाच्या सलातोंग भागाजवळ भारतीय जवान आणि नक्षलींमध्ये जोरदार धुमश्चक्री सुरु होती. या चकमकीत भारताच्या जवानांनी एका नक्षलवाद्याचा खात्मा केला होता. नक्षलवाद्याचा खात्मा केल्यानंतर छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णूदेव साय यांनी प्रतिक्रिया दिली. 'सरकार मोठ्या ताकदीने नक्षलवाद्यांच्या विरोधात लढत आहोत. नक्षलवाद्यांकडे दुसरा मार्ग देखील खुला आहे. आत्मसमर्पण करण्याचा मार्ग नक्षलवाद्यांकडे आहे.

१५ दिवसांपूर्वी २९ नक्षलवाद्यांचा खात्मा

पंधरा दिवसांपूर्वी छत्तीसगडच्या कांकेर जिल्ह्यातील जंगलात चकमक झाली. यावेळी सुरक्षा दलांनी २९ नक्षतवाद्यांचा खात्मा केला होता. तर या चकमकीत ३ जवान जखमी झाले होते.

बिनगुंडा आणि कोरोनार गावांधील हापतोला जंगलात दुपारी नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक उडाली होती. या जंगलात नक्षलवादी लपल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर सीमा सुरक्षा दल आणि पोलीस दलाच्या संयुक्त पथकाने शोधमोहीम होती घेतली होती. त्यासाठी सीमा सुरक्षा दलाचे जवान मोठ्या प्रमाणावर तैनात करण्यात आले होते. या घटनेनंतर २९ नक्षलवाद्यांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CBSE Announces Board Exam Schedule: दहावी-बारावी बोर्ड परीक्षा अपडेट! केंद्रीय मंडळाने जाहीर केले वेळापत्रक|VIDEO

बायकोचा गळा दाबून खून, नवऱ्यानं मृतदेह बाथरूममध्ये लपवला; लेकीनं आईला पाहिल्यानंतर... नेमकं घडलं काय?

Maharashtra Live News Update : पंतप्रधान नरेंद्र मोदींची जवानांसोबत दिवाळी

Mumbai Metro : मेट्रो 2B चा पहिला टप्पा कधी सुरू होणार, तारीख आली समोर, चेंबूरकरांना फायदाच फायदा

Crime News : जुगाराचा नवा फंडा! फायटर कोंबड्यांची झुंज लावून पैशांचा खेळ, पोलिसांची मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT