NEET protest, Abhijit Dipke Saam
देश विदेश

Exclusive : करोडो तरुण की एक धर्मेंद्र प्रधान? सरकारला कोण महत्त्वाचं? अभिजित दिपकेंचा आक्रमक सवाल

Abhijit Dipke latest statement on NEET protest : दिल्लीतील जंतर-मंतरवर सुरू असलेल्या नीट आंदोलनादरम्यान अभिजित दिपके यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी पुन्हा केली.

डॉ. माधव सावरगावे

माधव सावरगावे, साम टीव्ही प्रतिनिधी

NEET परीक्षा घोटाळ्याविरोधात दिल्लीतील जंतर-मंतरवर सुरू असलेल्या आंदोलनाने आता उग्र रूप धारण केले आहे. साम टीव्हीचे प्रतिनिधी माधव सावरगावे यांनी आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या अभिजित दिपके यांच्याशी थेट जंतर-मंतरवरून एक्सक्लुझिव्ह बातचीत केली. यावेळी अभिजित दिपके यांनी केंद्र सरकार आणि पोलिसांवर जोरदार हल्लाबोल केला.

आंदोलनाचे नेतृत्व करणारे अभिजित दिपके यांनी केंद्र सरकार आणि पोलिसांना थेट आव्हान देत अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला आहे. "वाटलं तर जंतर-मंतरवरून आमचा जालियनवाला बाग करून टाका, पण केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाल्याशिवाय आम्ही इथून एक पाऊलही मागे हटणार नाही," असा घणाघाती इशारा त्यांनी दिला आहे. मी एकटा नाहीये, देशाचे भवितव्य असणारे लाखो-करोडो युवक आज रस्त्यावर आले आहेत. सरकारला ठरवावे लागेल की त्यांच्यासाठी देश चालवणारे करोडो युवक महत्त्वाचे आहेत की एक धर्मेंद्र प्रधान? असा सवाल उपस्थित केला.

"सरकारला अहंकार! एका मंत्र्यासाठी करोडो युवकांचे भविष्य पणाला"

साम टीव्हीशी बोलताना अभिजित दिपके म्हणाले की, हे आंदोलन आता केवळ दिल्लीपुरते मर्यादित राहिलेले नसून देशभर पसरणार आहे. देशाचे भविष्य असणारा तरुण आज रस्त्यावर उतरला आहे. "सरकारला विचारण्याची वेळ आली आहे की, त्यांच्यासाठी देशातील करोडो युवक महत्त्वाचे आहेत की एक धर्मेंद्र प्रधान? सरकारला केवळ अहंकार झाला आहे, दुसरं काही नाही," असा घणाघाती आरोप त्यांनी केंद्र सरकारवर केला.

३ मागण्या सांगितल्या -

केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा तत्काळ राजीनामा.

पेपरफुटीच्या मानसिक त्रासामुळे ज्या विद्यार्थ्यांच्या आत्महत्या झाल्या, त्यांच्या कुटुंबांना योग्य भरपाई (Compensation) मिळावी.

२० जुलै रोजीच्या आंदोलनादरम्यान ज्या विद्यार्थ्यांवर खोट्या केसेस दाखल केल्या आहेत, त्या सर्व त्वरित मागे घेण्यात याव्यात.

"NSA लावा, UAPA लावा, पण आम्ही हटणार नाही!"

पोलिसांच्या कारवाईवर संताप व्यक्त करत दिपके म्हणाले, "करा आम्हाला अटक! आमच्यावर NSA लावा, UAPA लावा किंवा देशातील जेवढी कलमे असतील ती सगळी लावून टाका, आम्हाला काही फरक पडत नाही. पण आमच्या मागण्या पूर्ण झाल्याशिवाय आम्ही जंतर-मंतर सोडणार नाही." तसेच, आंदोलक विद्यार्थ्यांवर बळजबरी करणाऱ्या पोलिसांवर कडक शब्दांत ताशेरे ओढत, "आंदोलन दडपणाऱ्या एकाही गुंड पोलिसाला सोडणार नाही, सगळ्यांना कोर्टात खेचणार," असा इशाराही त्यांनी दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi 2026: साबुदाणा खिचडी सोडा, यंदाच्या आषाढी एकादशीला ट्राय करा पचायला हलकी अशी ताकातली भगर, वाचा रेसिपी

Side Effects of Sabudana : सावधान! 'हे' ३ आजार असतील तर साबुदाणा अजिबात खाऊ नका; डॉक्टरांनी दिला गंभीर इशारा

Arbaj Shaikh : "....आणि मी रॉकेल प्यायलो" सैराट फेम अभिनेत्याने सांगितला धक्कादायक किस्सा

Maharashtra News Live Update: जंतर-मंतरवरून लोक जाणार नाहीत, जोपर्यंत धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा देत नाही- अभिजीत दिपके

Rahul Gandhi: धर्मेंद्र प्रधान राजीनामा देत नाही तोपर्यंत चर्चा नाही, राहुल गांधी आक्रमक

SCROLL FOR NEXT