CJP founder Abhijeet Dipke arrived in Delhi and led a major protest at Jantar Mantar over alleged irregularities in NEET, CUET, CBSE and SSC GD examinations. T 
देश विदेश

Cockroach Janata Party: हातात संविधान अन् पोलिसांना फुलं; जंतर-मंतरवर 'कॉकरोच जनता पार्टी'चं शक्तिप्रदर्शन

Abhijeet Dipake : दीपके यांनी आंदोलनात येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला आपल्यासोबत एक पुस्तक आणि देशाचा तिरंगा घेऊन येण्याचे आवाहन केलंय. जंतर-मंतरवर तैनात असलेल्या पोलिसांना आदर आणि प्रेमाचे प्रतीक म्हणून 'फुलं' देण्यासही त्याने सांगितले आहे.

Bharat Jadhav

  • कॉकरोच जनता पार्टीने जंतर-मंतर येथे मोठे शक्तिप्रदर्शन केले.

  • सीजेपीने केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली.

  • अभिजीत दिपके अमेरिकेतून दिल्लीत पोहोचला.

नीट पेपर लीक प्रकरणावरून केंद्र सरकारविरोधात आंदोलन करण्याची घोषणा करणारे कॉकरोच जनता पार्टीचे (CJP) संस्थापक अभिजीत दिपके शनिवारी सकाळी अमेरिकेतून दिल्लीत आले आहेत. जंतर-मंतर येथे होणाऱ्या प्रस्तावित आंदोलनात सहभागी होण्यासाठी ते राजधानीत पोहोचले असून, आगमनानंतर त्यांनी समर्थकांना शांततापूर्ण आंदोलनाचे आवाहन केलं. दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरल्यावर अभिजीत दिपके यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर पोस्ट करत आंदोलनात सहभागी होणाऱ्यांना विशेष संदेश दिला. विमानतळावरून बाहेर पडताना त्याने हातातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे पुस्तक दाखवलं. त्यावेळी नागरिकांना आंदोलनात सहभागी होणअयाचे आवाहन केलं. दरम्यान NEET, CUET, CBSE आणि SSC GD सारख्या मोठ्या परीक्षांमधील कथित गोंधळ आणि पेपर लीकच्या मुद्द्यावरून सीजेपीने केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT