Abhijeet Dipke attacked in jaipur Rajasthan saam tv
देश विदेश

Abhijeet Dipke attacked : अभिजीत दिपकेंना मारहाण कोणी केली? हल्लेखोर कोण?

abhijeet dipke attacked in Jaipur : कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनात अभिजीत दिपकेंवर हल्ला करण्यात आला. हा हल्ला कोणी केला? दिपकेंनी या हल्ल्यानंतर काय प्रतिक्रिया दिली?

Suprim Maskar

  • जयपुरात अभिजीत दिपकेंवर हल्ला

  • एका हल्लेखोराला अटक, दुसरा फरार

  • दिपकेंवर हल्ला कोणी केला?

कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपकेंना राजस्थानमध्ये आंदोलनादरम्यान मारहाण करण्यात आलीय... मात्र ही मारहाण नेमकी कोणी केली? शांततापूर्ण आंदोलनात राडा कुणी आणि का घातला? दिपकेंनी या राड्यानंतर काय प्रतिक्रिया दिली.पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...

राजस्थानच्या जयपूरमधील शहीद स्मारकावर कॉकरोच जनता पार्टीच्या आदोलनात जोरदार राडा पाहायला मिळाला...'नीट' (NEET) परीक्षा आणि सीबीएसई (CBSE) पेपर घोटाळ्यानंतर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत 'कॉकरोच जनता पार्टी'चे संस्थापक अभिजीत दीपके यांनी या आंदोलनाचं नेतृत्व केलं. आंदोलनस्थळी शेकडो तरुण 'मी माझ्या देशावर प्रेम करतो, मी भ्रष्टाचार नाकारतो' आणि 'पेपरफुटी थांबवा' असे फलक आणि हातात तिरंगा घेऊन पोहोचले होते. मात्र, दीपकेंच्या समर्थकांच्या गर्दीत शिरून अचानक दोन तरुणांनी दीपके यांच्यावर हल्ला केला.

अभिजीत दीपके यांना समर्थकांनी खांद्यावर उचलून घेतलेलं असतानाच हा प्रकार घडला. दीपके यांना मारहाण करताच सीजेपीच्या कार्यकर्त्यांनी हल्लेखोराला चांगलाच चोप दिला....या झटापटीदरम्यान एक हल्लेखोर तरुण घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी ठरला, तर दुसऱ्याला पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतलं.

मात्र या आंदोलनातील हल्ल्यानंतर दीपकेंनी सरकारला आंदोलन सुरुच ठेवण्याचा इशारा दिलाय.

या हल्ल्यानंतर आणि प्रचंड गोंधळानंतरही अभिजीत दीपके यांनी अत्यंत संयम राखत आपल्या समर्थकांना शांततेचे आवाहन केले. दिल्ली आणि पुण्यातील यशस्वी आंदोलनानंतर दीपके यांनी जयपूरमध्ये आंदोलन केलं. या आंदोलनालाही तरुणांचा प्रतिसाद मिळाला. आता दीपके यांनी थेट देशाच्या राजधानीत पुन्हा एकदा 20 जूनला आंदोलनाचा इशारा दिलाय... त्यामुळे सुरक्षेच्या नावाखाली आंदोलनाला नकार दिला जातो की दिल्लीतील आंदोलनानंतर तरुणांचा उद्रेक आणखी पेटतो... याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागलयं...

ब्युरो रिपोर्ट, साम टिव्ही न्यूज

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Healthy fruit: सफरचंद नाही तर 'हे' 1 फळं खाऊन तुम्ही राहाल डॉक्टरांपासून दूर

Gold Price Today : आठवडाभरात सोन्याच्या दरात मोठी उसळी, मुंबईत २४ कॅरेट सोन्याच्या भाव ₹१,४४,९३० तोळा, वाचा ताजे दर

Maharashtra News Live Update: बीड पोलिसांना 112 वर खोटा फोन करणाऱ्या दोघांवर गुन्हा

Shocking : मुंबई हादरली! प्रसिद्ध हॉटेलमध्ये महिलेवर लैंगिक अत्याचार; बिझनेसमनला बेड्या

Hair Care Tips : तिशीतच केस पांढरे होत आहेत, काळेभोर केस या करण्यासाठी घरगुती उपायांचा वापर करा

SCROLL FOR NEXT