Swati Maliwal Saam Tv
देश विदेश

Swati Maliwal : सीएम केजरीवाल यांच्या घराबाहेरील CCTV समोर; महिला सुरक्षा कर्मचाऱ्यांसोबत दिसल्या स्वाती मालीवाल

Swati Maliwal Assult Case: आप खासदार स्वाती मालीवाल यांच्यावर झालेल्या कथित हल्ल्याप्रकरणी रोज नवनवीन खुलासे होत आहेत. आता या प्रकरणी एक नवीन सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे.

Rohini Gudaghe

प्रमोद जगताप, साम टीव्ही नवी दिल्ली

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी आप खासदार स्वाती मालीवाल यांच्यावर झालेल्या कथित हल्ल्याप्रकरणी रोज नवनवीन खुलासे होत आहेत. आता या प्रकरणी एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे. या सीसीटीव्ही फुटेजमध्ये काही सुरक्षा कर्मचारी स्वाती मालीवाल यांना मुख्यमंत्री निवासस्थानातून बाहेर काढताना दिसत आहेत. आम आदमी पक्षाच्या राज्यसभेच्या खासदार स्वाती मालीवाल यांचा हा व्हिडीओ मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानाबाहेरील असल्याचं सांगितलं जात आहे.

सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झालेला हा व्हिडिओ (Swati Maliwal Assult Case) १३ मेचा आहे. या दिवशी स्वाती मालीवाल यांनी त्यांच्यावर कथित हल्ला झाल्याचा आरोप केला होता. या व्हिडिओमध्ये काही महिला सुरक्षा कर्मचाऱ्यांनी स्वाती मालीवाल यांचा हात पकडला असल्याचं दिसत आहे. महिला कर्मचारी स्वाती मालीवाल यांना हाताला धरून बाहेर येताना दिसत आहे.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानचा हा नवीन CCTV समोर आला आहे. यामध्ये स्वाती मालीवाल मुख्यमंत्र्यांच्या घरातून बाहेर निघताना व्हिडिओत दिसत आहेत. विशेष म्हणजे या व्हिडिओत (Swati Maliwal CCTV) महिला सुरक्षा कर्मचारी देखील दिसत आहेत. स्वाती मालीवाल यांनी मुख्यमंत्री निवासस्थानी महिला पोलीस कर्मचारी नसल्याचा दावा केला होता. त्यामुळे आता पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

आप खासदार स्वाती मालीवाल यांनी मुख्यमंत्र्यांच्या पीएने त्यांना मारहाण केल्याचा आरोप केला आहे. याप्रकरणी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे पीए विभव कुमार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला (CM Arvind Kejriwal House) आहे. पोलीस यंत्रणा त्यांच्याविरुद्ध पुरावे गोळा करत आहे. तर आता स्वाती मालीवाल यांचा हा नवीन व्हिडिओ समोर आल्यानंतर चर्चांना पेव फुटले आहे. तर दिल्ली पोलिसांनी स्वाती मालीवाल यांनी मुख्यमंत्र्यांच्या घरी गोंधळ घातल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे आता या प्रकरणात पुढे कोणता खुलासा होणार, याकडे सर्वांचं लक्ष (Delhi News)लागलेलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hindi Language Controversy: मला मराठी येत नाही, ताकद असेल तर महाराष्ट्रातून हाकलून द्या; केडियानंतर राज ठाकरेंना अभिनेत्याचं ओपन चॅलेंज

Maharashtra Politics : राज ठाकरे संपूर्ण भाषणात कुठेही 'ते' वाक्य बोलले नाही; एकनाथ शिंदेंच्या बड्या नेत्याचा थेट मुद्द्याला हात

Navi Mumbai - Kalyan: नवी मुंबईहून कल्याणला चुटकीसरशी पोहोचता येणार, वाहतूक कोंडीची कटकटच संपणार

Pregnancy Care : गरोदरपणात महिला मंदिरात जाऊ शकतात का?

Ashadh Wari: देवेंद्र फडणवीसांची पत्नी अमृतांसोबत फुगडी | VIDEO

SCROLL FOR NEXT