AAP MLA Arreated Saam Tv
देश विदेश

MLA Arrested: आमदाराला पोलिसांकडून अटक, महिलेवर बलात्कार अन् धमक्या दिल्याचा आरोप

Harmeet Singh Pathanmajra Arrested: आम आदमी पार्टीचे आमदार हरमीत सिंग पठाणमाजरा यांना पोलिसांनी अटक केली. महिलेवर बलात्कार आणि धमकी दिल्याप्रकरणी पोलिसांनी ही कारवाई केली. गेल्या ७ महिन्यांपासून ते फरार होते.

Priya More

Summary -

  • आम आदमी पार्टीच्या आमदाराला अटक

  • बलात्कार, फसवणूक आणि धमकीचे आरोप

  • ७ महिन्यांपासून आमदार होते फरार

  • पोलिसांकडून पुढील तपास सुरू

आम आदमी पार्टीच्या आमदाराला पोलिसांनी अटक केली. महिलेवर बलात्कार आणि फसवणुक केल्याप्रकरणी पटियाला पोलिसांनी ही कारवाई केली आहे. हरमीत सिंग पठाणमाजरा असं या आमदाराचे नाव आहे. ते सुनौर मतदारसंघाचे आमदार आहेत. गेल्या सात महिन्यांपासून आमदार फरार होते अखेर पोलिसांनी त्यांना बेड्या ठोकल्या. सध्या पोलिस या आमदाराची चौकशी करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, आम आदमी पार्टीचे आमदार हरमीत सिंग पठाणमाजरा यांच्यावर बलात्कार, फसवणूक आणि धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा गुन्हा गेल्या वर्षी सप्टेंबर २०२५ मध्ये दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून आमदार फरार होते. न्यायालयाने यापूर्वीच आमदार हरमीत सिंग यांना फरार घोषित करत त्यांच्या शोधासाठी नोटीस जारी केली होती.

सप्टेंबर २०२५ मध्ये एका महिलेने आमदार हरमीत सिंग पठाणमाजरा यांच्याविरोधात सिव्हिल लाइन पोलिस ठाण्यामध्ये बलात्कार, फसवणूक आणि धमकी दिल्याप्रकरणी तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी या तक्रारीवरून आमदाराविरोधात गुन्हा दाखल केला होता. झिराकपूर येथे राहणाऱ्या या महिलेने आरोप केला की, आमदाराने आपण घटस्फोटीत असल्याचे भासवून तिच्यासोबत अनैतिक संबंध ठेवले होते. विवाहित असताना देखील आमदाराने या महिलेसोबत २०२१ मध्ये लग्न केले. या महिलेने आरोप केला की, आमदाराने तिला धमकावले आणि तिचे शोषण केले.

आमदाराविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर ते फरार झाले. त्यानंतर आमदाराने एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत आपण फरार झाले नसून एका बनावट चकमकीपासून वाचण्यासाठी पळून गेले असल्याचे सांगितले. पोलिसांनी माझ्या गाडीवर गोळीबार केला होता आणि देवाच्या कृपेने मी वाचलो असल्याचा दावा आमदाराने केला होता. हा व्हिडीओ २०२५ मध्ये व्हायरल झाला होता. पोलिसांनी आमदाराच्या शोधासाठी त्यांच्या निवासस्थानी आणि इतर ठिकाणी छापा देखील टाकला होता. पण त्याठिकाणी ते सापडले नाहीत. शेवटी लिसांनी त्यांना अटक केली. त्यांची रवानगी पोलिस कोठडीत करण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mantarlelya Shabdbanat: काव्य आणि सुरांचा संगम! 'मंतरलेल्या शब्दबनात’ची सुरेल मैफिल; ग्रेस-आरती प्रभूंच्या कवितांचा सोहळा

ट्रिपल रियर कॅमेरा अन् 5000mAh बॅटरी, Samsungने लॉन्च केले 2 बजेट फ्रेंडली स्मार्टफोन, तुमच्यासाठी कोणता बेस्ट? वाचा किंमत अन् फीचर्स

Amla And Curry Leaves Oil: आवळा आणि कढीपत्त्याच्या तेलाने केस होतील काळे आणि लांब, असा करा वापर

Iran-US War: रशियाच्या ड्रोनमुळे इराणची ताकद वाढली; अमेरिकेच्या वर्चस्वादी धोरणाला रशियाचा शह?

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार ३ पटीने वाढणार? बेसिक सॅलरी १८,००० वरुन ५१,४८० होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT