Amanatullah Khan ED Raid Saam TV
देश विदेश

Amanatullah Khan ED Raid: 'आप'चा आणखी एक आमदार ईडीच्या रडारवर; दिल्लीतील घरावर छापेमारी

AAP Leader Amanatullah Khan: गेल्या वर्षी एसीबीने अमानतुल्ला खान यांना अटक केली. अटकेनंतर काही काळाने अमानतुल्ला खान यांना जामिनीही मिळाला.

Ruchika Jadhav

Delhi News:

दिल्लीत आम आदमी पार्टीच्या नेत्यांवर ईडीच्या धाडीचे सत्र सुरूच आहे. आमदार अमानतुल्लाह खान यांच्या घरावर मंगळवारी सकाळी ईडीने छापेमरी केलीये. गेल्या वर्षी वक्फ बोर्ड मनी लाँड्रिंगसंबंधीत प्रकरणी ईडीने (अंमलबजावणी संचालनालयाने) अमानतुल्लाह खान यांच्या घरी धाड टाकलीये. (Latest Marathi News)

गेल्या वर्षी लाचलुचपत विभागाने एकूण ५ ठिकाणी छापेमारी केली होती. त्यावेळी १२ लाखांची रोकड, १ विनापरवाना असलेलं पिस्तूल आणि २ काडतुसे जप्त करण्यात आली होती. त्यामुळे गेल्या वर्षी एसीबीने अमानतुल्ला खान यांना अटक केली. अटकेनंतर काही काळाने अमानतुल्ला खान यांना जामिनीही मिळाला. या प्रकरणी आता ईडीने पुन्हा एकदा कारवाईला सुरूवात केलीये.

आरोप काय आहे?

अमानतुल्ला खान यांनी काही काळ दिल्ली वक्फ बोर्डाचे कामकाज पाहिले आहे. त्यावेळी त्यांनी नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. अमानतुल्ला खान यांनी नियमांचं उल्लंघन करत ३२ जणांची भरती केली, असा आरोप करण्यात आलाय. दिल्ली बोर्डाचे अध्यक्ष असताना भ्रष्टाचार आणि पक्षपात केल्याचा आरोपही त्यांच्यावर आहे.

दिल्लीत वक्फ बोर्डाच्या अनेक मालमत्ता बेकायदेशीरपणे भाड्याने देणे, तसेच पैशाचाही गैरवापर करणे असे आरोप अमानतुल्ला खान यांच्यावर करण्यात आलेत. आम आदमी पक्षातील नेत्यांवर सुरू असलेल्या कारवाईमध्ये याआधी राज्यसभा खासदार संजय सिंह यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आलीये.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT