Vande Bharat Express  saamtv
देश विदेश

Vande Bharat food : वंदे भारत एक्सप्रेसमध्ये देण्यात आलेल्या सांबारात किडे तरंगत असल्याचा व्हिडिओ व्हायरल, या ठिकाणी घडली घटना

Vande Bharat train food: वंदे भारत एक्सप्रेसमध्ये दिले जाणाऱ्या जेवणात किडे सापडले आहेत. वंदे भारत एक्सप्रेसमधून प्रवास करताना एका प्रवाशाला डब्यात देण्यात आलेल्या सांबरात किडे तरंगताना दिसले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई (Vande Bharat food): एकीकडे वंदे भारत एक्सप्रेसच्या निमीत्त्याने सरकार विकासाचा दाखला देत असताना दुसरीकडे मात्र ही रेल्वे खाद्य सेवेबाबत वादात सापडली आहे. या ट्रेनमध्ये दिल्या जाणाऱ्या जेवणाबाबत पुन्हा भोंगल कारभार समोर आला आहे.

वंदे भारत एक्सप्रेसमधून प्रवास करताना एका प्रवाशाने सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ॲल्युमिनियमच्या डब्यात देण्यात आलेल्या सांबरात किडे तरंगताना दिसत आहे. या ट्रेनने तिरुनेलवेली ते चेन्नई असा प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी सांगितले की, ट्रेनची चांगली सेवा असूनही त्यात दिले जाणारे जेवण समाधानकारक नाही. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर रेल्वेनेही प्रतिक्रिया दिली.

काँग्रेस खासदार मणिकम टागोर यांनी असाच एक व्हिडिओ शेअर करताना या समस्येचे निराकरण करण्यासाठी काय पावले उचलली जात आहेत हे जाणून घ्यायचे होते. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट करत ते म्हणाले, "प्रवाश्यांनी IRCTC ची स्वच्छता आणि उत्तरदायित्व यावर चिंता व्यक्त केली आहे. याला सामोरे जाण्यासाठी आणि प्रीमियम ट्रेनमध्ये अन्न सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी कोणती पावले उचलली जात आहेत?"

रेल्वेने दिले हे उत्तर 

या व्हिडिओवर रेल्वेने लगेच प्रतिक्रिया दिली. "या प्रकरणाची तात्काळ चौकशी करण्यात आली आणि दिंडीगुल स्थानकावरील आरोग्य निरीक्षकाकडे अन्नाचे पॅकेज सुपूर्द करण्यात आले," ते म्हणाले. रेल्वेने सांगितले की, तपासणीत फूड पॅकेटच्या झाकणाला कीटक अडकल्याचे समोर आले आहे. या घटनेबाबत सर्व्हिस प्रोव्हायडरला 50 हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. ते पुढे म्हणाले की, जेवणाचा दर्जा सुनिश्चित करण्यासाठी रेल्वे कटिबद्ध असून प्रवाशांच्या तक्रारींचे तातडीने निराकरण केले जात आहे.

मात्र, वंदे भारत ट्रेनमधून समोर आलेली ही पहिलीच घटना नाही. यापूर्वी एका व्यक्तीच्या अन्नात झुरळ आढळले होते. त्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. वंदे भारत ट्रेन मध्यम अंतराची सुपरफास्ट एक्स्प्रेस सेवा पुरवतात. हा सरकारच्या मेक इन इंडिया उपक्रमाचा एक भाग आहे.

Edited By- नितीश गाडगे

Warm Water Benefits: जेवल्यानंतर कोमट पाणी पिण्याचे जबरदस्त फायदे

सरकारकडून विद्यार्थ्यांना लॅपटॉप-सायकल फ्री? केंद्र सरकारची विद्यार्थ्यांसाठी नवी योजना?

Maharashtra Live News Update: वाशिमध्ये मतदानाच्या पार्श्वभूमीवर शहरातील प्रचाराचे बॅनर,पोस्टर आणि फ्लेक्स काढले

बिबट्याच्या दहशतीतही रणरागिणी पुढे; चंद्रपुरात महिलांचा धाडसी निर्णय

मतदानाच्या आदल्यादिवशी EVMमध्ये छेडछाड? शिंदे सेनेच्या आरोपाने राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT