भारतातील एक अनोखे गाव, जिथे होळीच्या दिवशी दगड फेकून मारले जातात! Saamtvnews
देश विदेश

भारतातील एक अनोखे गाव, जिथे होळीच्या दिवशी दगड फेकून मारले जातात!

वृत्तसंस्था

रांची : झारखंडमधील लोहरदगा जिल्ह्यातील बरही चटकपुर (Barahi Chatkpur) या गावात अनोख्या पद्धतीने होळी साजरी करण्याची परंपरा आहे. इथे होळीच्या दिवशी शेतात लाकडी खुंटा रोवला जातो. परंपरेनुसार गावातील नागरिक शेतात पुरलेला हा लाकडी खुंटा उपटण्याचा प्रयत्न करतात आणि या वेळी शेतात जमलेला जमाव त्यांना दगड आणि शेतातील मातीची ढेकळे फेकून मारतो. वरून दगड आणि ढेकळांचा पाऊस सुरु असतानाच जो कोणी जमिनीत रोवलेला हा खुंटा उपसण्यात यशस्वी होतो त्याला भाग्यवान मानले जाते. (A unique village in India, where stones are thrown on the day of Holi!)

यात्रेप्रमाणे पार पडते होळी

जमिनीत रोवलेला खुंटा उपसणे आणि खुंटा उपासणाऱ्यांना दगड-ढेकूळ फेकून मारण्याच्या या परंपरेमागे कोणतेही वैर नसून लोक अगदी खेळाप्रमाणे बंधुभावाच्या भावनेने ही परंपरा पाळतात. बरही चटकपुरची ही होळी पाहण्यासाठी लोहरदगा जिल्ह्याव्यतिरिक्त आजूबाजूच्या जिल्ह्यातून देखील मोठ्या संख्येने लोक येथे येतात. मात्र, या खेळात फक्त गावातील लोकांनाच सहभागी होण्याची परवानगी आहे.

शेकडो वर्षांची परंपरा

ही परंपरा शेकडो वर्षांपासून सुरू आहे. ही परंपरा कधी सुरू झाली आणि त्यामागील कथा काय आहे, हे कोणालाच माहीत नाही. होलिका दहनाच्या दिवशी पूजेनंतर, गावातील पुजारी खांब अथवा खुंटा जमिनीत गाडतात आणि दुसऱ्या दिवशी गावातील सर्व लोक एकत्र येऊन तो उपटून दगडफेक करण्याच्या उपक्रमात भाग घेतात.

सौभाग्य प्राप्ती होते; गावकऱ्यांची धारणा

दगड लागून दुखापत होण्याची भीती सोडून जे लोक खुंटा उपटून पुढे जातात त्यांना सुख आणि सौभाग्य मिळते, अशी श्रद्धा आहे. हे लोक सत्याच्या मार्गावर चालणारे मानले जातात. या दगडफेकीत आजपर्यंत कोणीही गंभीर जखमी झाले नसल्याचे गावातील लोकांचे म्हणणे आहे.

मुस्लिमही होतात सहभागी

विशेष म्हणजे या खेळात गावातील मुस्लिमही सहभागी होतात. आता हि अनोखी होळी पाहण्यासाठी इतर जिल्ह्यांतूनही लोक मोठ्या संख्येने येऊ लागले आहेत.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Uddhav Thackeray: 'दसरा मेळाव्यात शाहांचा फडशा पाडणार', उद्धव ठाकरे अमित शहांवर कडाडले

Ramdas Athawale: 'आंबेडकरांनी आरपीआयचं नेतृत्व करावं', रामदास आठवलेंची आंबेडकरांना ऑफर

Classical Language Status : अभिजात भाषेचा दर्जा म्हणजे काय? निर्णयाने काय होणार फायदा? जाणून घ्या संपूर्ण माहिती

Marathi News Live Updates : महायुतीत एकनाथ शिंदे १०० जागा लढवण्यावर ठाम?

Railway Employees Bonus 2024: रेल्वे कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड, केंद्राने बोनस केला जाहीर; मिळणार 'इतकी' रक्कम

SCROLL FOR NEXT