Odisha Miracle News Saam Tv
देश विदेश

Odisha Miracle News: अंत्यसंस्कार सुरु असतानाच 'मृत' महिला झाली जागी, ओडिशातील घटना

Odisha Shocking News: ओडिशामध्ये एक आश्चर्यकारक घटना घडली आहे. ओडिशामध्ये एका मृत महिलेचा अत्यंविधी सुरू असतानाच महिला जिवंत झाली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Odisha Women Open Her Eyes Before Cremation Miracle Incident:

ओडिशामध्ये एक आश्चर्यकारक घटना घडली आहे. ओडिशामध्ये एका मृत महिलेचा अत्यंविधी सुर असतानाच महिला जिवंत झाली आहे. ओडीशातील गंजाम जिल्ह्यातील बेरहामपूर शहरात ही घटना घडली आहे. (Latest News)

मिळालेल्या माहितीनुसार, ती महिला ५२ वर्षीय होती. ही महिला १ फेब्रुवारीला आगीत गंभीर भाजली होती. त्यामुळे तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथील डॉक्टरांनी तिला दुसऱ्या रुग्णालयात पाठवले. परंतु पैसे नसल्याने तिला तिच्या पतीने घरी नेले. तेव्हापासून तिला जास्त त्रास झाला.

यासंबंधित महिलेचा पती सिबाराम यांनी माहिती दिली. सोमवारी (१२ फेब्रुवारी)ला महिलेचे डोळे उघडत नव्हते. ती श्वास घेत नसल्याचे दिसले. त्यामुळे आम्हाला वाटले की, तिचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर कुटुंबातील इतर लोकांनी ही माहिती समजली, असे त्याने सांगितले.

आम्ही डॉक्टरांशी न बोलता महिलेचे मृत्यू प्रमाणपत्र मिळवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांनी महिलेचा मृतदेह बऱ्हामपूर महानगरपालिकेच्या बीजीपूर येथील स्मशानभूमीत नेला. त्यानंतर अत्यसंस्काराचे विधी होत असताना महिलेने डोळे उघडले. यामुळे सर्वांनाच धक्का बसला. त्यावेळी आम्ही तिला आवाज दिला. महिलेने या आवाजाला प्रतिसाद दिला. हा एक चमत्कारच आहे, असे महिलेच्या शेजारच्यंनी सांगितले. याबाबत स्थानिक नगरसेविकेला माहिती दिल्यानंतर महिलेला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: काका चुकांवर पांघरुण घालायचे, दादांना शरद पवारांची आठवण का आली

आय लव्ह मोहम्मद आणि आय लव्ह महादेव; देशभरात रंगलेला बॅनर वाद आणि त्यामागची खरी कारणे

Maharashtra Politics : शिंदे गटाच्या नेत्याच्या मुलाला मारण्यासाठी ४ कोटींची सुपारी; पोलिसांत गुन्हा दाखल, राजकीय वर्तुळात खळबळ

Ladki Bahin Yojana: सरकारी लाडकीला दणका, 15 कोटी वसूल करणार

Belly Fat: पोटाची चरबी वाढलीये? फॉलो करा 'या' सोप्या टिप्स, पोटाचा घेर होईल कमी

SCROLL FOR NEXT