Delhi Fire  Saam Tv
देश विदेश

Delhi Fire : नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी मोठी दुर्घटना; नर्सिंग होमला भीषण आग

दोघांचा होरपळून मृत्यू

वृत्तसंस्था

नवी दिल्ली - नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी दिल्लीतून एक दुर्दैवी बातमी समोर आली आहे. दिल्लीतील ग्रेटर कैलास भागातील एका नर्सिंग होमला रविवारी सकाळी भीषण आग लागली. या अपघातात दोन जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. त्याचवेळी आगीच्या विळख्यातून 6 जणांना वाचवण्यात यश आले आहे.

आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या ४ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि तासाभराच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले. सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. आधी भूकंपाचे धक्के आणि आता आग लागल्याने दिल्लीकरांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.

ग्रेटर कैलास पार्ट 2 येथील नर्सिंग होममध्ये भीषण आग लागली. आगीची माहिती अग्निशमन विभागाला पहाटे 5.14 वाजता देण्यात आली. अग्निशमन दलाच्या चार गाड्यांनी आग आटोक्यात आणली आहे. या आगीत दोन ज्येष्ठ नागरिक महिलांचा मृत्यू झाला, त्यांचे वय ९२ आणि ८२ वर्षे असल्याचे सांगण्यात येत आहे. याशिवाय एकाची प्रकृती चिंताजनक आहे. ही आग अत्यंत भीषण होती. धूर आणि आगीचे लोळ पाहून आजूबाजूचे लोकही धास्तावले. काही लोकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Naigaon BDD Project : 'बीडीडी'वासींच्या गृहप्रवेशाला मुहूर्त मिळाला, म्हाडाच्या घराच्या चाव्या या दिवशी मिळणार, वाचा...

Kitchen Hacks : जेवणात टोमॅटो का वापरावा ? जाणून घ्या कारण

Maharashtra Live News Update : राज ठाकरे उद्या पुणे दौऱ्यावर

Pooja Khedkar: बेशुद्ध केलं, हात-पाय बांधले नंतर...; पूजा खेडकर यांच्या घरी जबरी चोरी

Mugdha-Prathamesh : मुग्धा वैशंपायन-प्रथमेश लघाटेच्या घरी आला नवा पाहुणा, VIDEO शेअर करून दिली गुडन्यूज

SCROLL FOR NEXT