Mohan Bhagwat statement Saam tv
देश विदेश

भारतात मुस्लिम नकोत म्हणणारा हिंदूच नाही, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान

RSS Chief Mohan Bhagwat : RSS सरसंघचालक मोहन भागवत यांनी न्यूयॉर्कमधील ‘वन वर्ल्ड वन ह्युमॅनिटी’ कार्यक्रमात हिंदुत्व आणि मुस्लिम समाजाबाबत मोठे विधान केले. ‘भारतात मुस्लिम नकोत असा विचार करणारा हिंदू असू शकत नाही’, असे ते म्हणाले.

Namdeo Kumbhar

RSS chief Mohan Bhagwat New York speech : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत यांनी अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात आयोजित एका आंतरराष्ट्रीय कार्यक्रमात हिंदुत्व आणि मुस्लिम समाजाबाबत अत्यंत महत्त्वपूर्ण विधान केले आहे. "भारतात मुस्लिम नसू नयेत, असे जर कोणी हिंदू विचार करत असेल, तर तो व्यक्ती हिंदूच राहू शकत नाही," असे स्पष्ट आणि ठाम वक्तव्य मोहन भागवत यांनी केले. 'वन वर्ल्ड वन ह्युमॅनिटी' (एक जग, एक मानवता) या कार्यक्रमात बोलताना त्यांनी हिंदुत्वाचा खरा अर्थ सांगत सर्व धर्मांप्रती बंधुभाव आणि मानवी मूल्यांचा पुरस्कार केला.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) शताब्दी वर्षाच्या निमित्ताने सरसंघचालक मोहन भागवत हे सध्या अमेरिका, कॅनडा आणि ब्रिटनच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान न्यूयॉर्कमध्ये आयोजित 'वन वर्ल्ड वन ह्युमॅनिटी' या आंतरधार्मिक परिषदेत त्यांनी जगभरातील विविध धर्मांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला.

कार्यक्रमात बोलताना मोहन भागवत यांनी अत्यंत नम्रपणे सुरुवात केली. ते म्हणाले, मी मंचावर उपस्थित असलेल्या इतर धार्मिक नेत्यांसारखा कोणताही धर्मगुरू, विद्वान किंवा धार्मिक क्षेत्रातील मोठा अधिकारी नाही. मी एका सामान्य समाजात काम करणारा कार्यकर्ता आहे. मात्र आपल्या भारतीय संस्कृतीची हीच परंपरा आहे की, धर्म किंवा उपासना पद्धती वेगवेगळ्या असू शकतात, पण संपूर्ण मानवता एकच आहे.

हिंदुत्वाचा खरा अर्थ स्पष्ट केला

आपल्या भाषणात २०१८ मधील दिल्लीतील एका कार्यक्रमाचा उल्लेख करत भागवत म्हणाले की, त्यावेळी काही मुस्लिम बांधवांनी मला विचारले होते की, तुम्ही हिंदू राष्ट्राची गोष्ट करता, मग आमचे काय होणार? आम्हाला देशातून बाहेर काढणार का? त्यावर मी त्यांना सांगितले होते की, असा विचार करणे हे हिंदुत्व नाहीच.

पुढे स्पष्टीकरण देताना सरसंघचालक म्हणाले, जर आपण स्वतःला हिंदू म्हणवून घेत असू, तर सर्व मार्ग एकाच ईश्वराकडे जातात हे मानावेच लागेल. प्रत्येक माणसाचा सन्मान आणि प्रतिष्ठा समान आहे. त्यामुळे भारतात मुस्लिम नकोत असा विचार करणारा माणूस हिंदू असूच शकत नाही.

सत्य एकच, मार्ग अनेक

मोहन भागवत यांनी सांगितले की, जगभरात अनेक धर्म आहेत आणि प्रत्येकाच्या परंपरा व पद्धती वेगवेगळ्या आहेत. ईश्वरप्राप्तीसाठी धार्मिक शिस्त पाळणे आवश्यक असते. पण मूळ सत्य हे एकच आहे आणि संपूर्ण मानवता त्याच सत्यातून निर्माण झाली आहे. जर आपण समाजाला सातत्याने योग्य शिक्षण आणि संस्कार दिले नाहीत, तर समाजात गैरसमज पसरून लोक भरकटू शकतात.

टाइम्स स्क्वेअरवर झळकले मोहन भागवत

या कार्यक्रमापूर्वी न्यूयॉर्कमधील प्रसिद्ध 'टाइम्स स्क्वेअर' येथील मोठ्या डिजिटल बिलबोर्डवर मोहन भागवत यांची चित्रे झळकली होती. तिथे 'संकल्प, सौहार्द आणि संवाद' असा संदेश देण्यात आला होता. अमेरिकेतील भारतीय समुदायाने आणि प्रवाशांनी या बिलबोर्डसमोर मोठ्या उत्साहाने फोटो काढले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bombay High Court: मोठी बातमी! राज्यातील आणखी एक परीक्षा रद्द, क्लार्क पदाची टायपिंग टेस्ट पुन्हा होणार

Maharashtra News Live Update: नेपाळमधील महाराष्ट्रातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात

Nashik : धबधबे, द्राक्षांचेमळे अन् धुक्याची चादर; नाशिकमध्ये लपलेली 'ही' ठिकाणे पावसाळ्यात नक्की पाहा

Rain Update : महाराष्ट्रात पावसाची उसंत; पण पूर्व विदर्भाला येलो अलर्ट, मराठवाड्यात विजांसह सरींचा अंदाज

Anjeer Barfi Recipe: गोड खाण्याची इच्छा होते? मग घरच्या घरी बनवा स्वादिष्ट अंजीर बर्फी; वाचा खास रेसिपी

SCROLL FOR NEXT