Groom Lost his Life on Wedding Day Saam Tv
देश विदेश

Uttar Pradesh News: हृदयद्रावक! लग्नाच्या काही तास आधीच नवरदेवाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू, वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा

Uttar Pradesh News Today: काही तासांपूर्वी ज्या घरात लग्नाची तयारी सुरू होती. सगळेच आनंदात होते त्या आनंदावर नवरदेवाच्या मृत्यूने विरजण पडले.

Shivani Tichkule

Groom Lost his Life on Wedding Day: उत्तर प्रदेशातील बहराइच जिल्ह्यात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. याठिकाणी आपल्या नावरलीला आणण्यासाठी जाणाऱ्या नवरदेवाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाला आहे. कुटुंबीयांनी त्याला तातडीने रुग्णालयात उपचारासाठी नेले मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता. नवरदेवाच्या मृत्यूची बातमी मिळताच कुटुंबामध्ये शोककळा पसरली. (Latest Marathi News)

या घटनेमुळे लग्नघरात दु:खाचे वातावरण पसरले आणि लग्नाला आलेले लोक नवरदेवाच्या अंत्ययात्रेत सहभागी झाले. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना जरवल रोडच्या अटवा गावातील आहे. याठिकाणी राजकमल याचे वऱ्हाड अटैसा गावात जाणार होते. घरी लग्नाची (Marriage) पूर्ण तयारी झाली होती. नवरदेव राजकमलचे वऱ्हाड निघण्याच्या तयारीत होते. राजकमल देखील तयार झाला, बाशिंग बांधले आणि तितक्याच त्याची प्रकृती अचानक बिघडली. (Uttar Pradesh News)

त्यानंतर कुटुंबीयांनी त्याला तातडीने रुग्णालयात (Hospital) नेले. मात्र त्याठिकाणी डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. डॉक्टरांनी (Doctor) दिलेल्या माहितीनुसार, राजकमल याचा मृत्यू हृदयविकाराच्याने झाला. ही दु:खद वार्ता ऐकून कुटुंबाने टाहो फोडला. घटनेची माहिती मिळताच नवरी पक्षाचे लोकही राजकमलच्या घरी पोहोचले. काही तासांपूर्वी ज्या घरात लग्नाची तयारी सुरू होती. सगळेच आनंदात होते त्या आनंदावर राजकमलच्या मृत्यूने विरजण पडले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Astro Tips: पुस्तकात मोरपंख नव्हे, 'ही' गोष्ट ठेवा आणि जीवनात जाणवा सकारात्मक बदल

Raj Thackeray: महाराष्ट्र आणि मराठीसाठी आम्ही एकत्र, राज ठाकरेंनी दिले युतीचे संकेत

Marathi Schools In Worli : दादर वरळीमधील मराठी Top 9 शाळांची नावे

Face Care: आठवड्यातून किती वेळा फेस स्क्रब केलं पाहिजे?

Maharashtra Live News Update: विठ्ठल रुक्मिणी मंदिर फुलांनी सजले

SCROLL FOR NEXT