Viral Video saam tv
देश विदेश

Shocking Video: एका क्षणात सर्व संपलं! रेल्वे क्रॉसिंगवर कार थांबली; ट्रेनने जोरदार धडक दिली, थरारक VIDEO व्हायरल

Viral Video On America: अमेरिकेतील युटामध्ये झालेल्या भीषण अपघाताचा व्हिडिओ व्हायरल होत आहे, जिथे एका वेगवान ट्रेनने रेल्वे क्रॉसिंगवर अडकलेल्या एसयूव्हीला जोरदार धडक दिली. सीसीटीव्ही फुटेज पाहून लोक हादरले आहेत.

Dhanshri Shintre

सध्या सोशल मीडियावर एका भयानक अपघाताचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये, एका वेगवान ट्रेनने रेल्वे क्रॉसिंगवर अडकलेल्या एसयूव्ही कारला जोरदार धडक दिल्याचे दिसत आहे. हा भीषण अपघात रेल्वे क्रॉसिंगवरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. अमेरिकेतील युटामध्ये घडलेल्या या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली असून व्हिडिओ पाहून लोक थक्क झाले आहेत.

व्हायरल व्हिडिओमध्ये रेल्वे क्रॉसिंगवरजवळ वाहने जात असल्याचे दिसते. दरम्यान ट्रेन येण्यापूर्वीच क्रॉसिंग बंद होते. गडबडीत, एक व्यक्ती आपली एसयूव्ही कार रेल्वे क्रॉसिंगच्या आत घेऊन जातो. काही क्षणांत क्रॉसिंग पूर्णपणे बंद होते आणि तो ट्रॅकवर अडकतो. चालक गाडी मागे घेण्याचा आणि बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो, मात्र त्याला यश येत नाही. ही घटना पाहून लोक हादरले आहेत.

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे की रेल्वे क्रॉसिंगचे बॅरियर खाली आले आहेत आणि चेतावणी दिवे चालू आहेत. परिस्थिती गंभीर होत असल्याचे पाहून गाडी चालकाने वाहन तिथेच सोडून दिले. काही क्षणांतच एका वेगवान ट्रेनने गाडीला जोरदार धडक दिली आणि ते वाहन पूर्णपणे उडून गेले. सुदैवाने, चालकाने आधीच गाडी सोडली होती, अन्यथा हा अपघात जीवघेणा ठरला असता.

ट्रेनच्या धडकेमुळे गाडीचा अक्षरशः चुराडा झाला. युटा ट्रान्झिट अथॉरिटीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, अपघातामुळे वाहनाचे मोठे नुकसान झाले असून ट्रेनलाही तब्बल ८३ लाख रुपयांचे नुकसान सहन करावे लागले आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ ट्विटरवर 'Collin Rugg' या सोशल मीडिया अकांउटवर शेअर करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raj Thackeray and Uddhav Thackeray: बाळासाहेबांच्या फोटोसमोर दोन्ही भावांची भेट; राज-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे चर्चा

Chanting mantras Brahma Muhurta: ब्रह्म मुहूर्तावर करा 'या' मंत्रांचा जप; नशीब क्षणार्धात बदलेल

Dnyanada Ramtirthkar: ज्ञानदा रामतीर्थकरचा प्रमोशन लूक, व्हाईट ड्रेसमध्ये दिल्या स्टायलिश पोज

Shahapur : अतिवृष्टीमुळे शेतातील बेडाघर कोसळले; झोपलेल्या शेतकऱ्याचा दबून मृत्यू

Shivneri To Vasai Fort: शिवनेरी किल्ल्यापासून वसई किल्ल्यापर्यंत कसे पोहोचाल? जाणून घ्या सर्व पर्याय

SCROLL FOR NEXT