PM Modi Government Free Ration News Saam TV
देश विदेश

Free Ration News: मोफत रेशन घेणाऱ्यांना मोठा धक्का! मोदी सरकारने लागू केले नवीन नियम

Ration Card News: केंद्र सरकारने रेशनबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने ओपन मार्केट सेल स्कीम (OMSS) अंतर्गत राज्य सरकारांना देण्यात येणाऱ्या गहू आणि तांदूळाची विक्री थांबवली आहे.

साम टिव्ही ब्युरो

PM Modi Government Free Ration News: तुम्ही जर केंद्र आणि राज्य सरकारच्या मोफत रेशन योजनेचा लाभ घेत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. कारण, केंद्र सरकारने रेशनबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने ओपन मार्केट सेल स्कीम (OMSS) अंतर्गत राज्य सरकारांना देण्यात येणाऱ्या गहू आणि तांदूळाची विक्री थांबवली आहे.

मोदी सरकारच्या या निर्णयाचा परिणाम कर्नाटकसह काही राज्यांवर होण्याची शक्यता आहे. कारण, केंद्र सरकारकडून राज्यांना मिळणारा गहू आणि तांदूळ बंद होणार असल्याने मोफत रेशनही बंद होण्याची शक्यता आहे. (Latest Marathi News)

भारतीय अन्न महामंडळाने (FCI) जारी केलेल्या आदेशानुसार, राज्य सरकारांना डोमेस्टिक (OMSS) अंतर्गत गहू आणि तांदूळ विक्री बंद करण्यात आली आहे. केंद्राकडून (Free Ration) या निर्णयाची माहिती कर्नाटक सरकारला आधीच देण्यात आली होती.

कर्नाटकने ई-लिलावाशिवाय OMSS अंतर्गत आपल्या योजनेसाठी जुलै महिन्यासाठी 3,400 रुपये प्रति क्विंटल दराने 13,819 टन तांदूळ मागितला होता. OMSS अंतर्गत, ईशान्येकडील राज्ये, डोंगराळ राज्ये आणि नैसर्गिक आपत्तीमुळे प्रभावित झालेल्या राज्यांसाठी 3,400 रुपये प्रति क्विंटल दराने विक्री सुरू राहील.

बाजारातील किमती कमी करण्यासाठी आवश्यकतेनुसार FCI OMSS अंतर्गत खाजगी व्यापाऱ्यांना केंद्रीय पूल स्टॉकमधून (Ration Card) तांदूळ देऊ शकते. 12 जून रोजी, केंद्राने 31 मार्च 2024 पर्यंत गव्हावर स्टॉक मर्यादा लागू करताना खुल्या बाजारातील किंमत कमी करण्यासाठी OMSS अंतर्गत तांदूळ-गहू सोडण्याची घोषणा केली होती.

सरकारने OMSS अंतर्गत 15 लाख टन गहू केंद्रीय पूल ते पीठ गिरण्या, खाजगी व्यापारी आणि गहू उत्पादनांच्या उत्पादकांना ई-लिलावाद्वारे विकण्याची घोषणा केली होती. या व्यापाऱ्यांना OMSS अंतर्गत विक्रीसाठी असलेल्या तांदळाचे प्रमाण निश्चित करण्यात आले नव्हते.

केंद्र सरकारने 26 जानेवारी रोजी 2023 साठी OMSS धोरण आणले होते. या अंतर्गत राज्यांना त्यांच्या योजनांसाठी ई-लिलावात भाग न घेता FCI कडून तांदूळ आणि गहू दोन्ही खरेदी करण्याची परवानगी देण्यात आली होती.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नवऱ्याने जिंकली १२ कोटी रुपयांची लॉटरी, नंतर लाईव्ह स्ट्रीमवर महिलांवर उडवले सगळे पैसे; बायकोने थेट...

Maharashtra Live News Update : लक्ष लक्ष दिव्यांनी उजळला पंढरपूरचा चंद्रभागातीर...

Chhagan Bhujbal: आरक्षणाचा लढा, नेतृत्वावर घसरला? बीडच्या सभेत भुजबळांकडून लाव रे तो व्हिडीओ

ओबीसींचं नुकसान झालेलं नाही, राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या अध्यक्षांचं विधान; VIDEO

Bihar Election : ऐन निवडणुकीत इंडिया आघाडीला जोरदार झटका, एका राज्यातील सत्ताधारी मित्रपक्ष फुटला

SCROLL FOR NEXT