ins vikrant 2022 twitter/@indiannavy
देश विदेश

INS Vikrant News : INS विक्रांतवर नौसेनिकाचा मृतदेह सापडला, तपास सुरु

INS Vikrant News : गुरुवारी INS विक्रांतवर ही घटना उघडकीस आली आहे.

साम टिव्ही ब्युरो

INS Vikrant News : नौदलाच्या INS विक्रांत या जहाजावर 19 वर्षीय नौसैनिकाचा मृतदेह संशयास्पदरित्या अवस्थेत आढळून आला आहे. नौसैनिक अग्निवीर नसून नौदलाचा कायमस्वरूपी केडर होता. गुरुवारी INS विक्रांतवर ही घटना उघडकीस आली आहे.

प्रथमदर्शनी हे आत्महत्येचे प्रकरण असल्याचे संरक्षण विभागाकडून सांगण्यात आले आहे. त्याबाबत चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. अविवाहित नौसेनिक बिहारमधील मुझफ्फरपूर येथील रहिवासी होता. स्थानिक पोलिसांनी या प्रकरणी नोंद करुन तपास सुरु केला आहे. (Latest Marathi News)

अधिकाऱ्यांनी सांगितले की, गुरुवारी युद्धनौकेच्या एका भागात नौसेनिकाचा मृतदेह लटकलेला आढळला. या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश नौदलाला देण्यात आले आहेत. विमानवाहू युद्धनौका सध्या कोची येथे आहे.

या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी चौकशी समिती स्थापन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याप्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

२ दिवसांपूर्वी लग्न, हनिमूनला जाण्याची तयारी, पहाटे नवरदेवाचा मृतदेह बाथरूममध्ये आढळला, नेमकं घडलं काय?

आनंदाची बातमी! 'या' तारखेला महिलांच्या बँक खात्यात येणार १०-१० हजार रुपये

पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना संपवलं? व्हायरल मेसेजमागचं सत्य काय? VIDEO

ठाकरे बंधुंच्या वाटाघाटी पूर्ण? ठाकरेंच्या युतीचा फॉर्म्युला ठरला?

Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या राजकारणाचा होतोय बिहार; स्थानिक निवडणुकीत रक्तरंजित खेळ, VIDEO

SCROLL FOR NEXT