posco पाेक्साे अंतर्गत गुन्हा संग्रहित छायाचित्र SaamTV
देश विदेश

'दारु पिऊन, माझे कपडे काढले'; ९ शिक्षकांसह मुख्याध्यापकावर 'पाेक्साे'

या घटनेबाबत कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी संशयित आरोपींनी दिल्याचे पीडितांनी नमूद केले आहे.

साम न्यूज नेटवर्क

अलवर : राजस्थान येथील अलवर (alwar) जिल्ह्यात चार विद्यार्थ्यांवर सामूहिक अत्याचार आणि विनयभंग केल्याप्रकरणी नऊ शिक्षकांसह आणि शाळेच्या मुख्याध्यापकांवर पाेक्साे (posco) अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. पीडित मुलीच्या वडिलांनी ती शाळेत (school) का जात नाही, असे विचारल्यानंतर तिने कथन केलेल्या धक्कादायक माहितीनंतर ही घृणास्पद घटना वर्षभर सुरु हाेती हे समजले. दरम्यान अशाच प्रकाराची आणखी माहिती काही विद्यार्थींनीकडून (student) पाेलिसांच्या समाेर आली आहे.

सरकारी शाळेत दहावीत शिकणाऱ्या पीडितेने पाेलिसांना सांगितले, आमच्या शाळेतील शिक्षक आणि मुख्याध्यापक वर्षभर माझ्यावर अत्याचार करीत हाेते. त्यांना दोन महिला शिक्षक देखील साथ देत हाेते. काहींना या कृत्याचा व्हिडिओ केल्याचा आराेप पीडित विद्यार्थींनी केला आहे.

मानधना पोलिस ठाण्याचे अधिकारी मुकेश यादव म्हणाले या प्रकरणी तीन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तपासा दरम्यान आमच्याकडे आणखी तीन पीडित मुलींच्या तक्रारी समाेर आल्या आहेत. त्यांनी देखील मुख्याध्यापक आणि शिक्षकांवर अत्याचाराचे आराेप केले आहेत. पीडितांमध्ये इयत्ता तिसरी, चाैथी आणि सहावीतील विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या घटनेबाबत कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी संशयित आरोपींनी दिल्याचे पीडितांनी नमूद केले आहे.

या पीडितांपैकी एकीने याची माहिती महिला शिक्षिकेकडे केली असता तिने मुलींना त्यांचे शालेय शुल्क आणि पुस्तके माेफत देण्याचे आमिष दाखवले. तसेच याप्रकरणी कोणाकडेही तक्रार करू नये असे बजावले. दरम्यान शिक्षकेने मला तीन शिक्षकांच्या घरी नेऊन (मुख्याध्यापकांच्या घरी पण) तिथे मला बसण्यास सांगण्यात येत असे. यावेळी शिक्षकांनी मद्यपान करुन, माझे कपडे उतरवित माझ्याबराेबर चुकीचे कृत्य केले. हे अनेक वेळा घडल्याचे पीडितांपैकी एकीने ढसाढसा रडत कथन केले.

पिडितांच्या (चार जण) जबाबानुसार मानधना पोलिस ठाण्यात तीन वेगवेगळ्या गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये शाळेचे मुख्याध्यापक आणि नऊ शिक्षकांचा समावेश आहे. या सर्वांवर पाेक्साे अंतर्गत गुन्हा दाखल केल्याची माहिती मानधना पोलिस ठाण्याचे अधिकारी मुकेश यादव यांनी दिली.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Paneer And Tofu: पनीर आणि टोफूमध्ये काय फरक आहे?

Vastu Tips: कोणाकडूनही 'या' वस्तू फुकट घेऊ नका, संकटात याल

Sillod Assembly Election: भाजप आणि उद्धवसेनेचे सूर जुळले; ठाकरेंनीच दिली हाक

Jayant Patil : देवेंद्र फडणवीस यांनाच मुख्यमंत्री करण्याचा भाजपचा निर्धार; जयंत पाटील यांचा मोठा दावा

Chanakya Niti: या 3 सवयी असणाऱ्या व्यक्तीपासून कायम दूर राहा, आयुष्यात होईल पश्चात्ताप

SCROLL FOR NEXT