Chhattisgarh Latest news  Saam tv
देश विदेश

Clash Between Jawan And Naxal : छत्तीसगडच्या सीमवेर धुमश्चक्री; जवानांनी ९ नक्षलवाद्यांचा केला खात्मा, आता घटनास्थळी परिस्थिती काय?

Clash Between Jawan And Naxal at chhattisgarh : छत्तीसगडच्या सीमवेर सुरक्षा बलाचे जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये धुमश्चक्री सुरु आहे. जवानांनी आतापर्यंत ९ नक्षलवाद्यांचा खात्मा केला आहे.

Vishal Gangurde

छत्तीसगड : छत्तीसगडच्या दंतेवाडा आणि बीजापूर या सीमा क्षेत्रात सुरक्षा सुरक्षा बलाचे जवान आणि नक्षलवाद्यांची चकमक सुरु आहे. या चकमकीत जवानांनी आतापर्यंत ९ नक्षलवाद्यांचा खात्मा केला आहे. घटनास्थळी नक्षलवाद्यांचे मृतदेहासहित एसएलआर, ३०३ आणि १२ बोरचे हत्यार जप्त करण्यात आली आहे. या चकमकीनंतर सुरक्षा बलाचे जवान अलर्ट मोडवर आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पश्चिम 'बस्तर'च्या डिव्हिजनमध्ये माओवादी असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांची संयुक्त पथक त्यांच्या तपासावर निघालं. ३ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी १०.३० वाजता शोध सुरु असताना पोलिसांचा सामना हा पीएलजीए कंपनीच्या नक्षलवाद्यांशी झाला. यानंतर दोन्ही बाजूने गोळीबार झाला. दोन्ही बाजूकडून खूप वेळ गोळीबार सुरु होता.

मोठ्या शिताफीने जवान नक्षलवाद्यांचा सामना करत आहेत. दिलासादायक बाब म्हणजे या अभियानात सुरक्षा दलाचे जवान सुरक्षित आहेत. या सुरक्षा दलाच्या जवानांचं अभियान सुरु आहे. सुरक्षा दलाच्या जवानांकडून आणखी नक्षलवाद्यांना शोध सुरुच असल्याची माहिती मिळत आहे. या धुमश्चक्रीत आणखी नक्षलवाद्यांचा खात्मा होण्याची शक्यता आहे. या चकमकीत अद्याप कोणताही जवान जखमी झाल्याची माहिती मिळालेली नाही. या घटनेबाबत अधिक माहिती मिळालेली नाही.

काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र- छत्तीसगड सीमेजवळील वांडोली गावात पोलिसांनी नक्षलवाद्यांचा खात्मा केला. यावेळी चकमकीत १२ नक्षलवाद्यांचा खात्मा झाला होता. नक्षलवाद्यांचा खात्मा केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी कौतुक केलं आहे. या चकमकीनंतर पोलिसांनी नक्षलवाद्यांनी स्वयंचलित शस्त्र देखील जप्त केले आहेत. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, 'नक्षलवाद्यांच्या हालचालीवर निर्णायक आघात ठरणारी आहे. या पोलिसांच्या कामगिरीला सलाम आहे, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: नजर हटी दुर्घटना घटी! बोटीवर चालता चालता तरुणाचा गेला तोल अन्...पाहा पुढे नेमकं काय घडलं

CM Shinde: मी मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत नाही, पण...,CM पदाबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान

Singham Again Collection Day 16: 'सिंघम अगेन'ची धमाकेदार एन्ट्री, १६ व्या दिवशी रेकॉर्ड ब्रेक कमाई, कलेक्शन किती झालं?

Hingoli Vidhan Sabha : भाजपचे निम्मे कार्यकर्ते सोबत; हिंगोलीत अपक्ष उमेदवाराचा खळबळजनक खुलासा

Congress Vs BJP : नागपुरात प्रियंका गांधींच्या रोड शोदरम्यान काँग्रेस-भाजप आमनेसामने, कार्यकर्त्यांत राडा

SCROLL FOR NEXT