लग्नाहून परतणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला; आंध्र प्रदेशमध्ये भीषण अपघातात 9 जणांचा मृत्यू Saam Tv
देश विदेश

लग्नाहून परतणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला; आंध्र प्रदेशमध्ये भीषण अपघातात 9 जणांचा मृत्यू

आंध्र प्रदेशात अनंतपुरु जिल्ह्यामध्ये रविवारी झालेल्या भीषण रस्ता अपघातामध्ये ९ जणांचा जागीच मृत्यू झाला

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वृत्तसंस्था: आंध्र प्रदेशात अनंतपुरु जिल्ह्यामध्ये रविवारी झालेल्या भीषण रस्ता अपघातामध्ये ९ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. ज्यांनी जीव गमावला ते सर्व नातेवाईक असल्याचे पोलिसांनी (police) सांगितले आहे. त्यांनी सांगितले की या सर्व एसयूव्ही शेजारच्या कर्नाटक (Karnataka) राज्यामधील बेल्लारी येथून त्यांच्या मूळ गावी (village) उर्वकोंडा येथे कारमध्ये परतत असताना एका वेगवान ट्रकने त्यांच्या कारला धडक दिली आहे. (9 killed Andhra Pradesh road terrible accident)

हे लोक आज सकाळी कर्नाटकमधील बेल्लारी (Ballari) येथे भारतीय जनता पक्षाचे राज्य कार्यकारिणी सदस्य कोरा व्यंकटप्पा यांच्या मुलीच्या लग्नाला (married) उपस्थित राहून कारमधून आपल्या गावी परतत असताना अनंतपूर- बेल्लारी महामार्गावर विडापंकाळ ब्लॉक मधील कटलपल्ली गावाजवळ हा अपघात (Accident) झाला आहे. भरधाव येणाऱ्या ट्रकने कारला धडक दिली आहे. ही धडक इतकी जोरदार होती की कारचा पुढील भाग संपूर्ण चक्काचूर झाला आहे.

हे देखील पहा-

कारमधील ८ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. त्याचवेळी १ जण गंभीर जखमी झाला आहे. अपघातानंतर घटनास्थळी बघ्यांची गर्दी झाली होती. या दरम्यान, माहिती मिळताच स्थानिक उरावकोंडा पोलीस ठाण्याचे पोलीस दाखल झाले आहे. पोलिसांनी गंभीर जखमी व्यक्तीला रुग्णालयात पाठवले आहे. परंतु, त्याचाही मृत्यू झाला आहे. ट्रकची धडक बसल्याने कारचा चक्काचूर झाला आहे. मृतांचे मृतदेह कारच्या आतमध्ये अडकले होते. गाडीच्या आतून मृतदेह बाहेर काढण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांना मोठी धडपड करावी लागली आहे.

पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी स्थानिक शासकीय रुग्णालयात पाठवला आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रक भरधाव वेगात होता. विरुद्ध दिशेने येणाऱ्या टोयोटा इनोव्हा कारला ट्रक धडकल्याने चालकाचे नियंत्रण सुटले होते. या धडकेमध्ये कारचे मोठे नुकसान झाले आहे. ट्रक चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

मृतांमध्ये ६ महिला, २ मुले आणि कार चालकाचा समावेश आहे. उरावकोंडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, व्यंकटप्पा निंबगल्लू गावातील यांचा अपघातात मृत्यू झाला आहे. उर्वरित ८ मृत्यूपैकी ७ जणांची ओळख पटली आहे. बोम्मनकल गावातील अशोक, राधम्मा आणि सरस्वती, पिल्लालपल्ली गावातील शिवम्मा, रायलदोड्डी गावातील सुभारम्मा आणि लट्टावरम गावातील स्वाती आणि जान्हवी यांचा मृत्यू झाला आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope Sunday: कामाच्या ठिकाणी होतील वाद, वाचा तुमच्या राशीत काय?

Bacchu Kadu :...तर पालकमंत्र्यांच्या गाड्या फोडू; बच्चू कडू असे का म्हणाले?

Manoj Jarange: डोळ्यावर गॉगल आणि घोड्यावर स्वारी; मनोज जरांगेंचा हटके लूक व्हायरल, पाहा व्हिडिओ

Maharashtra Live News Update : तेरा वर्षांच्या मुलीची हत्या करणाऱ्याचा एन्काऊंटर करा; तृप्ती देसाईंची संतप्त मागणी

Kaas Pathar : फुलांनी बहरलेले नंदनवन, 'कास पठार 'चं सौंदर्य पर्यटकांना खुणावते

SCROLL FOR NEXT