8-year-old dies in school  Saam tv
देश विदेश

8-year-old dies in school : बापरे! 8 वर्षीय चिमुकलीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू, भरवर्गात जमिनीवर कोसळली

Child cardiac Arrest News : कर्नाटकात 8 वर्षीय चिमुकलीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. भरवर्गात जमिनीवर कोसळल्यानंतर तिला रुग्णालयात दाखल केले होते.

Vishal Gangurde

म्हैसूर : लोकांच्या जीवनशैलीत झपाटल्याने बदल होत चालला आहे. बहुतांश जण दररोजच्या कामाच्या धावपळीमुळे जेवणाकडेही दुर्लक्ष करतात. संपूर्ण दिवस-दिवस कामात बुडालेले व्यक्ती आरोग्याकडेही दुर्लक्ष करतात. त्यामुळे अशा लोकांना नानाविविध आजारांनी ग्रासले जाते. अनेकांना हृदयविकाराच्या आजारालाही सामोरे जावं लागतं. आता लहान मुलेही याच आजाराला बळी पडत असल्याचे समोर आले आहे. म्हैसूरमध्ये अवघ्या ८ वर्षांच्या चिमुकलीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ८ वर्षीय मुलीच्या मृत्यून तिच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

कर्नाटकातील खासगी शाळेत शिकणाऱ्या ८ वर्षीय चिमुकलीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. कर्नाटकाच्या चामराजनगर जिल्ह्यात सोमवारी ही घटना घडली. शाळेत जमिनीवर कोसळल्यानंतर तिला तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र, रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. डॉक्टरांनी तिचा मृत्यू कमी रक्तदाब किंवा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचा शंका व्यक्त केली आहे.

तेजस्विनी असे या शाळकरी मुलीचे नाव आहे. तेजस्विनी इयत्ता तिसरीत शिकत होती. ती सोमवारी सकाळी इतर विद्यार्थ्यांसोबत शाळेत पोहोचली. शाळेत तिची अचानक तब्येत बिघडली. त्यामुळे तेजस्विनीला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात दाखल केल्यानंतर तिला मृत घोषित करण्यात आले. तेजस्विनीच्या मृत्यूने तिच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

या घटनेनंतर शाळेतील शिक्षकांनी तातडीने तेजस्विनीच्या पालकांना संपर्क करण्यास सुरुवात केली. तिच्या पालकांचा फोन सायलेंट मोडवर होता. तिचे आई-वडील कुल्लूर गावातील मंदिरात गेले होते. निंगराजू आणि श्रृती असे तिच्या आई-वडिलांचे नाव आहे. मंदिरातून जाऊन आल्यानंतर त्यांना ही बाब कळाली.

मुलीसाठी मंदिरात प्रार्थना करण्यासाठी गेलो होतो, असे त्यांनी सांगितले. मुलीच्या मृत्यूनंतर तिच्या आई-वडिलांनी मृतदेहाचा पोस्टमार्टम करण्यास परवानगी दिली नाही. नेहमी हसत खेळत असणाऱ्या तेजस्विनीच्या मृत्यूने गावावर शोककळा पसरली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Churchgate Tourism : काळे ढग, रिमझिम पाऊस अन् हिरवीगार मुंबई! वीकेंडला फिरा 'ही' ५ निसर्गरम्य ठिकाणे

३ वर्षे काम केलं, पैसे मिळाले नाहीत! २०० कोटींच्या थकीत बिलांसाठी ठेकेदार आक्रमक

KBC 18: दिवसाला ८०० रुपये कमावणाऱ्या कृष्ण कुमावत यांनी KBCमध्ये जिंकले ५० लाख; १ कोटींच्या प्रश्नावर घेतला 'हा' निर्णय

DA Hike 2026 : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर! DA मध्ये थेट 3% वाढ? पगारात होणार एवढी वाढ

Gold Price Today: सोन्याच्या दरात मोठी घसरण, १० तोळं सोनं २१५०० रुपयांनी स्वस्त; वाचा सुवर्णनगरीतील आजचे दर

SCROLL FOR NEXT