J&K Accident News saam tv
देश विदेश

Jammu - Kashmir Accident: जम्मू-काश्मीरमध्ये CRPF जवानांना घेऊन जाणाऱ्या वाहनाला अपघात, ८ जण जखमी

J&K Accident: जखमी जवानांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत.

Priya More

Jammu Kashmir CRPF Van Accident: जम्मू काश्मीरमध्ये (Jammu Kashmir) सीआरपीएफ जवानांच्या वाहनाला मोठा अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. सीआरपीएफ (CRPF) जवानांना घेऊन जाणाऱ्या वाहनाला सिंध नाल्याजवळ अपघात झाला. या अपघातामध्ये सीआरपीएफचे आठ जवान जखमी झाले आहेत. जखमी जवानांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, जम्मू -काश्मीरच्या गांदरबल जिल्ह्यात रविवारी केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (CRPF) वाहनाला अपघात झाला. या अपघातात आठ जवान जखमी झाले आहेत. जखमी जवानांना नजीकच्या रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सीआरपीएफ जवान एका वाहनातून बालटाल मार्गावरून अमरनाथ यात्रेकडे जात होते. याच दरम्यान त्यांच्या वाहनाला अपघात झाला.

सीआरपीएफ जवानांच्या वाहनाला गांदरबलमधील सिंध नाल्याजवळ अपघात झाला. या अपघातामध्ये आठ जवान जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले आहेत. जखमींना बालटाल बेस कॅम्प रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले आहे.

दरम्यान, जम्मू-काश्मीरमध्ये अमरनाथ यात्रेला आलेल्या एका महिला भाविकाचा मृत्यू झाला झाला आहे. अंगावर दगड कोसळल्यामुळे या महिलेचा मृत्यू झाला आहे. तर इतर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तात्काळ लष्कराच्या हेलिकॉप्टरच्या सहाय्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: विक्रोळीत इलेक्ट्रॉनिक हार्डवेअरच्या दुकानाला भीषण आग, दुकान जळून खाक

Young Cricketer Death: टीम इंडियाच्या खेळाडूने संपवलं आयुष्य; क्रिकेट विश्वात खळबळ

Famous Actor : मळके कपडे, धड उभंही राहता येईना; प्रसिद्ध अभिनेत्याला नेमकं झालं तरी काय? व्हायरल VIDEO नं चाहते चिंतेत

America: अमेरिकेत अचानक 'ग्राउंड स्टॉप', ४ तास एकही विमानाने उड्डाण घेतलं नाही; नेमकं कारण काय?

Kitchen Hacks : मिरची कापताच हातांची होतेय आग? साबण नाही, तर 'या' सोप्या उपायाने मिनिटांत जळजळ होईल कमी

SCROLL FOR NEXT