Uttar pradesh Shocking Saam tv
देश विदेश

Shocking : मित्राच्या मुलीला पाहून म्हाताऱ्याची नियत फिरली; लाडूचं आमिष देऊन अत्याचार, ५ महिन्यांनी काळंकृत्य उघड

Uttar pradesh Shocking News : मित्राच्या मुलीला लाडूच्या आमिष देऊन अत्याचार केल्याची घटना घडली आहे. म्हाताऱ्याचं काळकृत्य पाच महिन्यांनी उघडं पडलं.

Vishal Gangurde

75 वर्षीय म्हाताऱ्याकडून १४ वर्षीय मुलीवर अत्याचार

अल्पवयीन मुलगी ५ महिन्यांची राहिली गरोदर

पीडित मुलीच्या आईच्या तक्रारीवरून पोलिसांत गुन्हा दाखल

आरोपीच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरु

उत्तर प्रदेशच्या औरेया जिल्ह्यातील एका ७५ वर्षीय म्हाताऱ्याने मित्राच्या मुलीवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. १४ वर्षाची अल्पवयीन मुलगी ५ महिन्याची गर्भवती झाल्यानंतर गुन्ह्याचा उलगडा झाला. यानंतर पीडित मुलीच्या आईच्या कोतवाली पोलिसांत म्हाताऱ्याविरोधात तक्रार दिली. पोलिसांनी आईच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करत कारवाईला सुरुवात केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बिधून कोतवाली पोलिस स्टेशनच्या हद्दीत घडलेल्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. अत्याचाराच्या घटनेनंतर पोलिसांनी मुलीला वैद्यकीय चाचणीसाठी रुग्णालयात पाठवण्यात आलंय. पीडितेच्या आईने तक्रारीत म्हटलं की, '१४ वर्षीय मुलगी पाच महिन्यांपूर्वी शेतातून घरी परतत होती. त्यावेळी गावातील म्हाताऱ्याने मुलीला पाहिलं. त्याने प्रसादाच्या बहाण्याने घरात बोलावलं. त्यानंतर घरात लाडू देऊन मुलीवर अत्याचार केल्याची घटना घडली.

आरोपीने अत्याचारानंतर घटना कोणालाही सांगू नये, यासाठी पीडितेला जीवे मारण्याची धमकी दिली. आरोपीने मुलीला गोळ्या झाडून जीवे मारण्याची देखील धमकी दिली. आरोपीच्या धमकीला अल्पवयीन मुलगी घाबरून गेली.

आरोपीच्या धमकीनंतर मुलीने घरात कोणालाही घडलेल्या घटनेविषयी सांगितलं नाही. मात्र, ५ महिन्यानंतर मुलगी गरोदर असल्याचे आईला समजले. त्यानंतर पीडित आईने पोलिसांत जाऊन तक्रार दाखल केली. त्यानंतर पीडित मुलीच्या जबाबावरून आरोपीच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे. आरोपीच्या लवकरच मुसक्या आवळणार असल्याचे पोलिसांनी सांगितलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

T20 World Cup मध्ये टीम इंडियाची विजयी घोडदौड,सलग चौथा विजय; नेदरलँड्सचा १७ धावांनी पराभव

Crime: १३ वेळा चाकूने वार करत महिलेला संपवलं, नंतर आरोपीने धावत्या ट्रेनसमोर उडी मारली

Crime News: 'तो घरी परत यायला नको'; नवऱ्याला रस्त्यातून हटवण्यासाठी प्रियकरासोबत बायकोनं रचला भयानक कट

Shocking: बड्या राजकीय नेत्याच्या मुलाचा एन्काऊंटर, पोलिस अधिकाऱ्यावर केला होता गोळीबार

मोठी बातमी! ठाकरेंनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट; राज्याचा राजकारणाला हादरा

SCROLL FOR NEXT