mahakumbh  Saam tv
देश विदेश

Mahakumbh 2025 : महाकुंभात 7000 महिलांचा संन्यास; नव्या पिढीला सनातन धर्माची ओढ, वाचा स्पेशल रिपोर्ट

Maha Kumbh Prayagraj 2025 : महाकुंभात लाखो भाविक अध्यात्माच्या ओढीने जातात...यंदा या महाकुंभात हजारोंच्या संख्येने भाविक संन्यास घेतायत...आणि यात महिलाही मागे नाहीयेत...यंदा किती महिलांनी महाकुंभात संन्यास घेतलाय आणि संन्यासानंतर कसे असते त्यांचे आयुष्य...पाहुयात या स्पेशल रिपोर्टमध्ये....

Tejal Nagre

प्रयागराजमध्ये आयोजित महाकुंभाला 13 जानेवारीपासून सुरुवात झालीये...तर महाशिवरात्रीपर्यंत हा महाकुंभमेळावा सुरु रहाणार आहे.....मुख्य म्हणजे यावेळेस महिलांनी संन्यास घेण्याची संख्या लक्षणीय ठरलीये....प्रयागराजमधील कुंभमेळ्यात आतापर्यंत 7000 महिलांनी संन्यास घेतलाय...तर 246 महिलांनी नागा संन्यासिनीची दीक्षा घेतलीये.

संन्यास घेणं ही सोप्पी गोष्ट नाहीये... संन्यास घेण्यासाठी कठोर तपश्चर्या करावी लागते... कोणत्याही महिलेला संन्यासाची दीक्षा देण्याआधी तिच्या पूर्ण आयुष्याची माहिती घेतली जाते आणि पात्र ठरल्यानंतरच तिला दीक्षा दिली जाते..

दरम्यान संन्यास घेतल्यानंतर कसे असते महिलांचे आयुष्य पाहुयात....

कसे असते संन्यासिनीचे आयुष्य ?

कुटुंब आणि सामाजिक जीवनाचा त्याग करणे

केशवपन करून स्वत:चे पिंडदान करणे

पूर्ण आयुष्य ईश्वराला समर्पित करणे

महत्त्वाचं म्हणजे दीक्षा घेतलेल्या महिलांमध्ये अगदी अभिनेत्रीपासून ते आयआय़टीयन्सपर्यंत उच्चशिक्षित महिलांची संख्या अधिक आहे. यावर्षी महाकुंभात येणारे जवळपास 40 टक्के भाविक हे युवा पिढीतले असनू एकूणच सनातन धर्माविषयी तरुण पिढीला खरचं ओढ वाटते की हे तात्पुरतं आकर्षण आहे, असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Alibag Fishing Boat Capsizes: समुद्रात मच्छीमार बोट बुडाली; 5 खलाशांनी 9 तास पोहून गाठला किनारा, 3 जण बेपत्ता

Amravati Accident: चिखलदरा पर्यटन स्थळावर मोठा अपघात; ६०० फूट खोल दरीत कोसळली कार

Mahayuti Phone Taping: महायुतीच्या मंत्र्यांचेच फोन टॅप? रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ

UPI Payment: फुकट UPI व्यवहार बंद होणार? प्रत्येक व्यवहारावर पैसे मोजावे लागणार?

PM Kisan: कधी मिळणार PM किसानचा हप्ता? 20 व्या हप्त्याची प्रतिक्षा कायम, कोणाला नाही मिळणार पैसा?

SCROLL FOR NEXT