Bhatpara Bomb Blast ANI
देश विदेश

Bomb Blast : बॉम्बला बॉल समजून हातात घेतलं; स्फोटात ७ वर्षीय चिमुकल्याचा दुर्देवी अंत

पश्चिम बंगालच्या उत्तर २४ परगणा जिल्ह्यात एक भयंकर घटना घडली.

साम टिव्ही ब्युरो

मुंबई : पश्चिम बंगालच्या उत्तर २४ परगणा जिल्ह्यात एक भयंकर घटना घडली. येथील रेल्वे ट्रॅक परिसरात खेळत असताना, लहान मुलांनी बॉल समजून बॉम्ब हातात घेतला. खेळण्याच्या नांदात या बॉम्बचा भीषण (Bomb Blast) स्फोट झाला. या घटनेत ७ वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाला. तर, दोन जण गंभीर जखमी झाले. या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

प्राप्त माहितीनुसार, कोलकात्यापासून सुमारे ३० किमी अंतरावर असलेल्या भाटपारा येथील काकीनारा आणि जगद्दल रेल्वे ट्रॅक परिसरात ही भयंकर घटना घडली. निखिल पासवान (वय ७ वर्ष) असं मृत्युमुखी पडलेल्या मुलाचे नाव आहे. पोलिसांनी (Police) दिलेल्या माहितीनुसार, काही लोकांनी हा बॉम्ब रेल्वे ट्रॅकवर ठेवला होता.

त्यावेळी काही मुले रेल्वे ट्रॅक परिसरात खेळत होती. यातील निखिल नामक मुलाने बॉल समजून हे बॉम्बचे पॅकेट हातात घेतले. दरम्यान, खेळता-खेळता या बॉम्बचा भयंकर स्फोट झाला. या स्फोटात निखीलचा जागीच मृत्यू झाला. तर आणखी एक बालक आणि एक महिला जखमी झाली.

घटनेची माहिती मिळताच, स्थानिक पोलिसांसह आरपीएफच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी झालेल्या महिला आणि मुलाला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. स्फोटाच्या ठिकाणी आणखी एक बॉम्ब आढळून आल्याने पोलिसांनी याची माहिती बॉम्ब शोधक पथकाला दिली. त्यानंतर बॉम्ब निकामी पथकाने तो बॉम्ब निकामी केला.

दरम्यान, रेल्वे ट्रॅकवर हे बॉम्ब कुणी ठेवले होते. याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. ही घटना रेल्वे रुळाजवळ घडल्याने स्थानिक पोलीस, काकीनाडा जीआरपी आणि आरपीएफ या प्रकरणाचा कसून तपास करत आहे. ऐन दिवाळी सणात बॉम्बस्फोटात चिमुकल्या निखिलचा मृत्यू झाल्याने परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टर मधील बॅगांची करण्यात आली तपासणी

Viral Video: भंयकर वास्तव! पाय ठेवायला जागा नाही, तरीही भाऊचा लोकलच्या दारात उभं राहून प्रवास, व्हिडीओ पाहा

Solapur Airport : सोलापूरकरांचे नागरी विमानसेवेचे स्वप्न साकार! २० डिसेंबरपासून मुंबई आणि गोवासाठी विमानसेवा

Viral Video: नजर हटी... मोबाइलच्या नादात भरकटला, दुचाकी थेट कारला धडकली, थरारक घटना कॅमेऱ्यात कैद!

Astrology: आजपासून 'या' राशींचे दिवस चमकणार, शनीची साडीसती संपणार

SCROLL FOR NEXT