खळबळजनक: जमिनीच्या वादातून 6 जणांची गोळ्या झाडून हत्या, 2 जखमी Saam Tv
देश विदेश

खळबळजनक: जमिनीच्या वादातून 6 जणांची गोळ्या झाडून हत्या, 2 जखमी

बिहार येथील नालंदा येथील जमिनीच्या वादावरून बुधवारी दुपारी दोन्ही पक्षांमध्ये हिंसक संघर्ष झाला. खळबळजनक घटनेत सहा जणांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे.

वृत्तसंस्था

नालंदा: बिहार Bihar येथील नालंदा Nalanda येथील जमिनीच्या वादावरून बुधवारी दुपारी दोन्ही पक्षांमध्ये हिंसक संघर्ष झाला. या खळबळजनक घटनेत सहा जणांची गोळ्या झाडून हत्या Murder करण्यात आली आहे. या गोळीबारात दोन जण जखमी झाले आहेत. ही घटना छबिलापूर पोलीस स्टेशन परिसरातील लोदीपूर गावात घडली आहे. एकमेकांशी भिडणारे दोन्ही पक्ष एकाच कुटुंबाचे असल्याचे सांगितले जात आहे. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ अधिकारीही घटनास्थळी पोहोचले. जखमींना स्थानिक रुग्णालयात हलवण्यात आले आहे. सहा जणांच्या हत्येमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

हे देखील

छबीलापूर पोलीस स्टेशन परिसरातील लोदीपूर गावात दोन पाटीदार (गोट्या) यांच्यात जोरदार गोळीबार झाल्याचे सांगितले जाते. अचानक झालेल्या गोळीबारामुळे संपूर्ण परिसर ढवळून निघाला. गुन्हा केल्यानंतर आरोपी पळून गेले. येथे घटनेची माहिती मिळताच, अनेक पोलीस ठाण्यांचे पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. आरोपींच्या अटकेसाठी पोलीस पथक छापे टाकतआहे.

त्याचवेळी कुटुंबीयांचे म्हणणे आहे की, जमिनीच्या वादातून सकाळी ९ वाजल्यापासून गोळ्या झाडल्या जात होत्या. पोलिसांनाही या प्रकरणाची माहिती देण्यात आली होती, परंतु ती घटनेनंतर पोहोचली. कुटुंबीयांचा आरोप आहे की, जर पोलीस सकाळी पोहचले होते आणि बदमाशांना रोखले असते. तर आज एकाचा सुद्धा मृत्यू झाला नसता. दोषींवर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थ करत आहेत.

वृत्तानुसार माहिती आहे की, त्या ठिकाणी तरुणांनी अंदाधुंद गोळीबार सुरू केला होता. यामुळे चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दोन जणांचा रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला. 50 बिघा जमिनीचा वाद आहे. हे प्रकरण न्यायालयातही सुरू आहे. यदु यादव, पिंटू यादव, शिवेंद्र यादव, धीरेंद्र यादव, मधेश यादव आणि बिंदा यादव यांचा गोळ्या लागल्याने मृत्यू झाला आहे. घटनेनंतर गावात तणावचे वातावरण आहे. अनेक पोलीस ठाण्यांचे पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Matka King Review : विजय वर्माचा 'मटका किंग' पास की फेल? प्रेक्षकांना कसा वाटला?

Kalyan Tourism : प्राचीन भिंती अन् भक्कम दरवाजे, कल्याणमधील 'हा' किल्ला जपतोय ऐतिहासिक वारसा

Ladki Bahin Yojana: उरला फक्त शेवटचा आठवडा! लाडक्या बहिणींनो आताच eKYC करा, अन्यथा ₹१५०० कायमचे बंद होणार; प्रोसेस वाचा

Rain Alert : राज्याला अवकाळीचा तडाखा, वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस; मुंबई, ठाणेसह २४ जिल्ह्यांसाठी पुढील काही तास महत्त्वाचे

Maharashtra News Live Update: नाशिकमध्ये तिसऱ्या मजल्यावरून लिफ्ट कोसळली, महिलेसह ३ चिमुकले गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT