Nepal Bus Accident: Saam Tv
देश विदेश

Nepal Bus Accident: भाविकांवर काळाचा घाला! नेपाळमध्ये बस नदीत कोसळली, ६ भारतीयांसह ७ जणांचा मृत्यू

6 Indian Died In Nepal Bus Accident: या अपघातामध्ये सहा भारतीयांसह ७ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर १९ जण जखमी झाले आहेत.

Priya More

Nepal News: नेपाळमध्ये बसला भीषण अपघात (Nepal Bus Accident) झाल्याची घटना समोर आली आहे. भाविकांना घेऊन जाणारी बस नदीमध्ये कोसळून हा अपघात झाला. नेपाळच्या मधेश प्रांतात ही घटना घडली. या अपघातामध्ये सहा भारतीयांसह ७ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर १९ जण जखमी झाले आहेत. जखमींवर वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पोलिसांकडून (Nepal Police) अपघाताचा तपास सुरु आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नेपाळमध्ये भाविकांना घेऊन जाणारी बस दरीमध्ये कोसळली. मधेश प्रांतात डोंगराळ भागातून जाणारी ही बस 50 मीटर खोल दरीत असलेल्या नदीमध्ये कोसळली. या अपघातामध्ये सहा भारतीय भाविकांसह सात जणांचा मृत्यू झाला. या अपघातामध्ये १९ जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

गुरुवारी पहाटे मधेश प्रांतातील बारा जिल्ह्यात हा अपघात झाला. राजस्थानवरुन भाविकांना ही बस घेऊन जात होती. ही बस दरीमध्ये कोसळून चुरियामाई मंदिराच्या दक्षिणेला नदीच्या काठावर पडली. रस्त्यापासून सुमारे 50 मीटर खाली ही बस कोसळली. अपघातामध्ये मृत्यू झालेल्यांमध्ये सहा भारतीय आणि एका नेपाळी नागरिकाचा समावेश आहे.

पोलीस उपअधीक्षक प्रदीप बहादूर छेत्री यांनी सांगितले की, भाविकांना घेऊन जाणारी बस पलटी होऊन रस्त्यावरुन नदीत पडली. बसमध्ये एकूण २६ प्रवासी होते. मृतांमध्ये सहा भारतीय आणि एका नेपाळी व्यक्तीचा मृत्यू झाला. मृतांच्या कुटुंबीयांना माहिती देण्यात आली आहे. या अपघातानंतर पोलिसांनी बस चालक जिलामी खानसह तीन जणांना ताब्यात घेतले आहे. या अपघातात चालक आणि सहकाऱ्यांनाही दुखापत झाली असून त्यांना उपचारानंतर ताब्यात घेण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chemical Free Facewash For Pimple And Dark Spots: पिंपल्स आणि काळ्या डागांवर सोपा घरगुती उपाय, घरच्या घरी बनवा केमिकल फ्रि फेसवॉश!

कानाला बंदूक,२ राऊंड फायर अन् २७ किलो सोनं गायब! जळगावात चित्रपटालाही शोभेल असा बँक दरोडा, असा उघड झाला कट

Maharashtra News Live Update: पाणी गळती विरोधात पुण्यात अनोख आंदोलन

भाजपचा अजब कारभार! वर्षभरापूर्वी निधन झालेल्या नेत्याला कार्यकारिणीत स्थान; दिली मोठी जबाबदारी

SBI क्रेडिट कार्ड वापरताय? 1 डिसेंबरपासून नियम बदलणार, पेट्रोल-डिझेल आणि प्रवासासाठी जास्त पैसे मोजावे लागणार!

SCROLL FOR NEXT