5G Service In India
5G Service In India Saam Tv
देश विदेश

5G in India : या '१३' शहरांमध्ये सर्वप्रथम मिळणार 5G सेवा; महाराष्ट्रातल्या २ शहरांचा समावेश

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नवी दिल्ली: भारतातील 5G ​​स्पेक्ट्रमच्या लिलावाला केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. भारतात लवकरच 5G सेवा उपलब्ध होणार आहे. यंदाच्या दिवाळीपर्यंत आपल्याला 5G सेवांची भेट मिळू शकते, असे बोलले जात आहे. 5G चा लिलाव २६ जुलै २०२२ ला होणार आहे. २० वर्षांच्या वैधतेसह 72 GHz वरील स्पेक्ट्रमसाठी लिलाव आयोजित केला जाणार आहे. स्पेक्ट्रमसाठी वेगवेगळ्या कमी (600 MHz, 700 MHz, 800 MHz, 900 MHz, 1800 MHz, 2100 MHz, 2300 MHz), मध्यम (3300 MHz) आणि उच्च (26 GHz) फ्रिक्वेन्सीमध्ये लिलाव होणार आहे. भारतातील 5G हे ​​4G पेक्षा सुमारे १० पटीने वेगवान असेल असा दावा भारत सरकार करत आहे. सुत्रांच्या माहितीनुसार या वर्षी ऑक्टोबरच्या अखेरीस 5G सेवा सामान्या ग्राहकांना वापरता येईल. (5G Network In India News)

हे देखील पाहा -

आता अशी काही क्षेत्रे आहेत ज्यात 5G सेवा सर्वात अगोदर दिली जाईल. भारतात अजूनही अशी अनेक ठिकाणे आहेत जिथे 4G कनेक्टिव्हिटी देखील योग्यरित्या काम करत नाही. त्यामुळे अगोदर याकडे कंपन्यांना लक्ष द्यावं लागणार आहे. सध्या सुरुवातीच्या टप्प्याला आधी 5G कनेक्टिव्हिटी ही भारतातील १३ मोठ्या शहरांमध्ये देण्यात येणार आहे. दूरसंचार विभागाच्या म्हणण्यानुसार, 5G कनेक्टिव्हिटी देशातील मोठ्या १३ शहरांमध्ये सुरू करण्यात येणार आहे, त्यानंतर याचे निरीक्षण करुन योग्य ते आवश्यक ते बदल करुन मग संपुर्ण देशात 5G सेवा सुरू करण्यात येणार आहे. मात्र भारतात व्यावसायिक 5G सेवा सुरू करणारा कोणता टेलिकॉम ऑपरेटर पहिला असेल हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. सध्या बाजारात उपलब्ध असलेले Jio, Airtel आणि Vi या तीन ऑपरेटर्सपैकी कोणतीही एक कंपना सर्वात अगोदर ही सेवा सुरू करु शकते.

भारतातील या '१३' शहरांमध्ये सर्वप्रथम 5G कनेक्टिव्हिटी सेवा मिळणार:

१) अहमदाबाद (5G Newtork In Ahmedabad)

२) बंगळुरू (5G Newtork In Bengaluru)

३) चंदीगड (5G Newtork In Chandigarh)

४) चेन्नई (5G Newtork In Chennai)

५) दिल्ली (5G Newtork In Delhi)

६) गांधीनगर (5G Newtork In Gandhinagar)

७) गुरुग्राम (5G Newtork In Gurugram)

८) हैदराबाद (5G Newtork In Hyderabad)

९) जामनगर (5G Newtork In Jamnagar)

१०) कोलकाता (5G Newtork In Kolkata)

११) लखनऊ (5G Newtork In Lucknow)

१२) मुंबई (5G Newtork In Mumbai)

१३) पुणे (5G Newtork In Pune)

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sanjay Raut News | फडणवीसांना शिंदे मुख्यमंत्री म्हणून नको होते? राऊतांचा मोठा दावा!

Bank Holiday: मतदानामुळे उद्या देशातील 49 शहरात बँका राहणार बंद, महाराष्ट्रातील शहरांची पाहा लिस्ट

Akola News : पाण्यासाठी शोले स्टाईल आंदोलन; उपसपंचासह सदस्यांचे अकोटमध्ये आंदोलन

Loksabha Election 2024: 'शतकवीर' जयंत पाटील! पायाला भिंगरी बांधून महाराष्ट्र पिंजून काढला; प्रचारसभांचा केला अनोखा विक्रम |VIDEO

Health Tips: ३० मिनिटांपेक्षा जास्त मोबाईलवर बोलताय? होऊ शकतात 'हे' गंभीर आजार

SCROLL FOR NEXT