5G Service In India Saam Tv
देश विदेश

प्रतिक्षा संपली! ‘या’ शहरांमध्ये आजपासून सुरू होणार 5G सेवा; PM मोदींच्या हस्ते उद्घाटन

टेलिकॉम क्षेत्रासाठी आजचा दिवस ऐतिहासिक दिवस ठरणार आहे. कारण, आजपासून देशात 5जी मोबाईल सेवा सुरु होणार आहे.

साम टिव्ही ब्युरो

5G Service in India : टेलिकॉम क्षेत्रासाठी आजचा दिवस ऐतिहासिक दिवस ठरणार आहे. कारण, आजपासून देशात 5जी मोबाईल सेवा सुरु होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सकाळी 10 वाजता या सेवेचं उद्घाटन होणार आहे. पहिल्या टप्प्यात ही सेवा एकूण 13 शहरांमध्ये सुरू करण्यात येणार आहे.

टेलिकॉम क्षेत्रातील प्रमुख कंपन्या रिलायन्स जिओ, एअरटेल आणि वोडाफोन आयडिया या 5G सेवेच्या स्पर्धेत आहेत. त्यामुळे आता यापैकी कोणती कंपनी 5G इंटरनेटची सुरूवात करणार हे पाहवं लागेल. दुसरीकडे 5G सेवा सुरू होण्याआधीच विविध कंपन्यांकडून 5G मोबाईल लॉंच करण्यात आले आहेत. सध्या बाजारात अनेक 5G मोबाईल उपलब्ध आहेत.

कोणकोणत्या शहरात सुरू होणार 5G सेवा?

सुरूवातीला देशातील 13 शहरांमध्ये 5G सेवा सुरू होणार आहे. यामध्ये दिल्ली, मुंबई, अहमदाबाद, बंगळुरू, चंदीगड, चेन्नई, गांधीनगर, गुरुग्राम, हैदराबाद, कोलकाता, जामनगर, लखनऊ, पुणे या शहरांचा समावेश आहे. दोन वर्षांनंतर 5G सेवेचा देशभरात झपाट्याने विस्तार केला जाईल.

या सेवेने देश सुपरफास्ट होणार असून लोकांना जलदगतीने इंटरनेट उपलब्ध होईल. भारतावर 5G चा एकूण आर्थिक प्रभाव 2035 पर्यंत 450 अब्ज अमेरिकन डॉलरपर्यंत असण्याचा अंदाज आहे. 4G च्या तुलनेत, 5G नेटवर्क अनेक पटींनी जलद गती देते.

5G सेवेसाठी किती पैसे मोजावे लागणार?

5G सेवेच्या रिचार्जसाठी किती पैसे मोजावे लागणार? याबाबतची माहिती अद्यापही समोर आलेली नाही. मात्र, तज्ञांच्या माहितीनुसार, सुरुवातीला 5G साठी 4G इतकीच किंमत मोजवा लागण्याची शक्यता आहे. त्यानंतर मात्र टेलिकॉम कंपन्या 5Gच्या किंमतीत वाढ करतील, असा अंदाज बांधला जातोय.

5G सेवा आज जरी लॉन्च केली जाणार असली, तरी प्रत्यक्षात ग्राहकांना मात्र या सेवेसाठी ग्राहकांना आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे. एअरटेल आणि जिओ यांच्याकडून 5G सेवेला सुरूवात केली जाण्याची शक्यता आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime : २१ वर्षीय तरुणीचा रात्री संशयास्पद मृत्यू, पहाटेच अंत्यसंस्कार, नेमकं कारण काय?

Jaya Bachchan: 'हे काय करताय तुम्ही...'; जया बच्चन यांना राग अनावर, सेल्फी काढायला आलेल्या व्यक्तीला दिला जोरात धक्का

Padsare Waterfall : धबधब्यावर भिजायला आवडतं? मग 'पडसरे धबधबा' तुमच्यासाठी ठरेल बेस्ट ऑप्शन

Maharashtra Politics : भाजपला नवी मुंबईत खिंडार, ठाकरे गटाने दिला मोठा धक्का; VIDEO

नगरसेवकाचा लोगो, BMW गाडी आणि आत 32 कोटींचं MD ड्रग | VIDEO

SCROLL FOR NEXT