गुरमीत राम रहीमसह 5 दोषींना जन्मठेपेची शिक्षा; कोर्टाचा निकाल Saam Tv
देश विदेश

गुरमीत राम रहीमसह 5 दोषींना जन्मठेपेची शिक्षा; कोर्टाचा निकाल

डेरा सच्चा सौदाचे प्रमुख बाबा राम रहीम यांना कोर्टाने आजन्म कारावासाची शिक्षा सुनावलेली आहे

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

चंदिगड : पंजाब मधून एक महत्वाची बातमी समोर आली आहे. डेरा सच्चा सौदाचे प्रमुख बाबा राम रहीम यांना कोर्टाने आजन्म कारावासाची शिक्षा सुनावलेली आहे. सेवादार रणजितसिंह याच्या हत्येप्रकरणी राम रहीम यांना दोषी ठरवण्यात आले होते. त्यानंतर आज त्यावर त्यांना शिक्षा सुनावण्यात आली आहे. बाबा राम रहीम यांच्याबरोबर त्यांच्या इतर ५ साथीदारांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

हे देखील पहा-

विशेष म्हणजे कोर्टाने राम रहीम यांना ३१ लाख तर इतर ४ आरोपींना प्रत्येकी ५० हजार रुपयांचा दंड ठोठावले आहे. सीबीआयच्या स्पेशल कोर्टात गुरमीत राम रहीम यांना आजन्म जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. त्याचबरोबरच तर ४ आरोपींना देखील जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. राम रहीम आणि त्यांच्या सहकाऱ्यांना कोर्टात ८ ऑक्टोबर दिवशी दोषी ठरवण्यात आले होते. पण कोर्टाने निकाल राखून ठेवला होता. कोर्टाकडून आज त्या निकालाचे वाचन करण्यात आले आहे.

त्याअगोदर हरियाणाच्या पंचकूला जिल्ह्यात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच जिल्ह्यामध्ये कलम १४४ लागू करण्यात आले आहे. रणजितसिंह यांची १० जुलै २००२ साली हत्या करण्यात आली होती. या हत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडून सुरु होता. सीबीआयने ३ डिसेंबर २००३ दिवशी या प्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आले होते.

मागील १९ वर्षांपासून या प्रकरणावर कोर्टात खटला चालू होता. अखेर ८ ऑगस्टला या प्रकरणाचा युक्तीवाद संपला होता. त्यानंतर आज राम रहीमला आजन्म जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. विशेष म्हणजे याअगोदर राम रहीमला पत्रकार रामचंद्र छत्रपती यांच्या हत्येप्रकरणी देखील कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

Edited By- Digambar jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP आणि काँग्रेसच्या आंदोलनादरम्यान भाजपला मिळाली खूशखबर; तीन ठिकाणी दणदणीत विजय

Crime News: महिला पोलिसाचा संशयास्पद मृत्यू, पोलिस असणाऱ्या नवऱ्याला अटक; नेमकं काय घडलं?

Maharashtra News Live Update : सोनसरी आश्रमशाळेतील विद्यार्थिनीच्या मृत्यूप्रकरणी कारवाई; अधीक्षिका निलंबित करण्याचे आदेश

Shivsena : शिवसेना कुणाची? सुनावणी पुन्हा लांबणीवर; कारण आले समोर

भाजपच्या 100 नगरसेवकांना कारणे दाखवा नोटीस; पक्षात खळबळ

SCROLL FOR NEXT