India Alliance Latest News Saamtv
देश विदेश

India Aaghadi Meeting: तारीख ठरली! दिल्लीत 'या' दिवशी होणार इंडिया आघाडीची बैठक; लोकसभेच्या जागा वाटप - रणनितीवर चर्चा होणार?

India Aaghadi Meeting: इंडिया आघाडीची ६ डिसेंबरला ठरलेली बैठक रद्द करण्यात आली. त्यानंतर आता अखेर इंडिया आघाडीच्या चौथ्या बैठकीची तारीख जाहीर करण्यात आली आहे.

Gangappa Pujari

प्रमोद जगताप, दिल्ली|ता. ११ डिसेंबर २०२३

I.N.D.I.A. Alliance Meeting:

नुकत्याच पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूका झाल्या. या निवडणूकीत कॉंग्रेसला फक्त एका राज्यात सत्ता मिळवता आली. कॉंग्रेसच्या पराभवामुळे विरोधकांच्या इंडिया आघाडीतही सर्वकाही आलबेल नसल्याचे दिसून आले. इंडिया आघाडीची ६ डिसेंबरला ठरलेली बैठक रद्द करण्यात आली. त्यानंतर आता अखेर इंडिया आघाडीच्या चौथ्या बैठकीची तारीख जाहीर करण्यात आली आहे.

इंडिया आघाडीची (India Alliance) ६ डिसेंबरला ठरलेली बैठक रद्द झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या होत्या. मात्र ही बैठक याच महिन्यात होईल, असे इंडिया आघाडीतील नेत्यांकडून सांगण्यात येत होते. अखेर इंडिया आघाडीच्या चौथ्या बैठकीची तारीख जाहीर करण्यात आली आहे. १९ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजता नवी दिल्लीमध्ये (New Delhi) ही बैठक होणार आहे.

नुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या निवडणूकांमधील (5 State Election) पराभवावर या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. तसेच पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणूकांची रणनितीही ठरवली जाऊ शकते. सोबतच किमान समान कार्यक्रम आणि लोकसभेच्या जागावाटपाबाबत (Lokasabha Election 2024) देखीलबैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.

कॉंग्रेस नेते जयराम रमेश (Jayram Ramesh) यांनी एक्स अकाउंटवर ट्वीट करत या बैठकीची माहिती दिली आहे. इंडिया आघाडीची चौथी बैठक मंगळवारी १९ डिसेंबर २०२३ ला दुपारी ३ वाजता नवी दिल्लीत पार पडेल. जुडेगा भारत, जितेंगा इंडिया! असे त्यांनी या पोस्टमध्ये म्हणले आहे. (Latest Marathi News)

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : ठाकरेंच्या मेळाव्यासाठी मनसेने छापले खास टीशर्ट, पाहा व्हिडिओ

Maharashtra Live News Update: कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण ५० टक्के भरले

Hockey Asia Cup: पाकिस्तान खेळणार 'आशिया कप', हॉकी संघ भारतात येणार: क्रीडा मंत्रालयाचा हिरवा कंदील

Underi : उंदेरी किल्ला कधी पाहिला का? पावसाळ्यात ट्रिप प्लान कराच

Marathi Vijay Melava : "गुजरात फॉर्म्युला महाराष्ट्रात विषासारखा पसरला आहे"; ठाकरेंचा फडणवीस सरकारवर टीकेचा बाण

SCROLL FOR NEXT