सुप्रीम मस्कर, साम टिव्ही
इराण-इस्रायलमधील युध्द मध्यस्थी करून मिटवल्याचा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा आनंद अमेरिकेच्याच पेन्टागॉनच्या अहवालामुळेच मावळला. कारण ज्या कारणासाठी हे युध्द छेडलं गेलं ते अण्विक प्रकल्प नष्ट झालेले नसून त्यांच काही प्रमाणात नुकसान झाल्यांचं या अहवालात म्हटलं आहे. एवढंच नव्हे तर १० अणुबॉम्ब निर्मिती क्षमतेचं तब्बल ४०० किलो युरेनिअम गायब झाल्याचं वास्तव समोर आलं आहे.
400 किलो युरेनियम गायब?
अमेरिकेच्या हल्ल्यात आण्विक तळाचं अंशत: नुकसान
हल्ल्याआधीच 400 किलो युरेनियम गायब
400 किलो युरेनियमच्या सहाय्यानं 10 अणुबॉम्बची निर्मिती शक्य
अणुबॉम्ब निर्मितीसाठी युरेनियम 60% समृद्ध असणं गरजेचं
गायब झालेलं युरेनियम 90 % समृद्ध
अमेरिकेनं इराणमधील अणुप्रकल्पावर हल्ला करण्याच्या आधी फोर्डो अणुप्रकल्पाबाहेर एकूण 16 ट्रकची रांग दिसली. या ट्रकचे सॅटेलाईट फोटो व्हायरलही झाले होते. पण हल्ल्यांनंतर हे ट्रक अचानक गायब झाले. ज्यामुळे इराणनं अमेरिकेच्या हल्ल्यापूर्वी फोर्डो अणुप्रकल्पातील युरेनियमचा साठा इतरत्र हलवल्याचा दावा करण्यात आला. तर अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जे. डी. व्हान्स यांनीही या दाव्याला दुजोरा दिलाय. 'येत्या काही आठवड्यांत आम्ही युरेनियमसंदर्भातील पावलं उचलू आणि त्या युरेनियमचं काय करायचं, याबाबत धोरण ठरवू. इराणशी युद्धासंदर्भातल्या चर्चेदरम्यान हे युरेनियम हा आमच्यासाठी एक महत्त्वाचा मुद्दा असेल', असं त्यांनी म्हटलं आहे.
आता प्रश्न आहे की हे 400 किलो युरेनिअम नेमकं कुणाच्या ताब्यात आहे? हे युरेनिअम जर इराणकडेच असेल तर या युरेनियमच्या मदतीने दुसऱ्या आण्विक तळावर आपला अणुकार्यक्रम राबवू शकतो. इराणनं हे युरेनियम इस्फाहान येथील एका भूमिगत केंद्रावर हलवल्याचंही सांगितलं जातय. त्यामुळे इराणकडील युरेनियमच्या साठा कायम राहिल्यानं युध्द संपलं असल तरी अणुयुध्दाची भीती मात्र कायम राहणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.