Corona Update  Saam Tv News
देश विदेश

Corona News : केंद्राकडून कोरोना अलर्ट, देशात ४ हजार रुग्ण; मार्गदर्शक सूचना जाहीर

Corona Update : देशभरात कोरोना रुग्णांच्या संख्येत दररोज वाढ होत आहे. सक्रीय रुग्णांची संख्या चार हजारांवर गेली आहे. त्यामुळे केंद्र सरकारकडून मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्यात.

Girish Nikam

गिरीश निकम, साम टिव्ही

नवी दिल्ली : देशभरात कोरोना संसर्गामध्ये वाढ होत होतेय. देशात चार हजारांवर रुग्णसंख्या पोहचली आहे. त्यामुळे प्रत्येक राज्यातील आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं मार्गदर्शक सूचना जाहीर केल्यायत. या मार्गदर्शक सूचनांच्या कार्यवाहीसाठी महाराष्ट्रातील आरोग्य विभागानं पाऊल उचललंय. कारण राज्यातही पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ५०० झालीये. आरोग्य यंत्रणांच्या सज्जतेचा आढावा घेण्यास सुरुवात केलीय.

सरकारच्या मार्गदर्शक सूचना

वृद्ध आणि रोग-प्रतिकारशक्ती कमी असलेल्यांनी मास्क वापरा

श्वसन विकाराच्या रुग्णांवर बारकाईने लक्ष ठेवा, सर्वेक्षण करा

पॉझिटिव्ह रुग्णांचे नमुने विषाणूचा प्रकार ओळखण्यासाठी तपासणीसाठी पाठवा

राज्यभरात रुग्णालयांच्या तयारीचा आढावा घेण्याचे निर्देश

ऑक्सिजन, पीपीई कीट, व्हेंटिलेटर पुरेशा प्रमाणात उपलब्ध ठेवा

केंद्राकडून परदेशातील प्रवासाबाबतही सूचना देण्यात आल्या आहेत. पाच देशांमध्ये प्रवास करणं टाळा असा इशारा तज्ज्ञांनी दिलाय. चीन, सिंगापूर, तैवान, हाँगकाँग, अमेरिका या देशात कोरोना रुग्णांमध्ये वाढ होतेय. त्यामुळे तिथे प्रवास टाळा. जर प्रवास अटळ असल्यास कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचं पालन करण्याचा सल्ला केंद्र सरकारकडून देण्यात आलाय.

राज्यातही मुंबई, पुण्यातील वाढती रुग्णसंख्या चिंतेची बाब आहे. या दोन्ही महत्वाच्या शहरांमध्ये एकूण रुग्णसंख्या ५० च्या वर गेली आहे. उपराजधानी नागपुरातही आत्तापर्यंत १३ रुग्णांचे नोंद झाली आहे. त्यामुळे ताप, घसा दुखणे किंवा खवखवणे यासारखी लक्षणे ४८ तासानंतर कायम असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेण्याची सूचना आरोग्य विभागाने केली आहे. सध्यातरी कोरोनाचं संकट रोखण्यासाठी मास्क वापरणे, अंतर राखणे यासारखे उपाय अंगीकारणे हिताचे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ED Raid : ईडीची सर्वात मोठी कारवाई; ३५०० कोटींच्या १६० मालमत्ता जप्त, नेमकं काय आहे प्रकरण?

Rice Papad Recipe: पांढरे शुभ्र, खुसखुशीत तांदळाचे पापड कसे बनवायचे?

Pune Politics: राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्षाची पक्षातून हकालपट्टी, ऐन निवडणुकीच्या काळात पुण्यात मोठी घडामोड

Maharashtra Live News Update: केडीएमसीच्या निवडणुकीसाठी नऊ ठिकाणी मतमोजणी

Tharala Tar Mag: 'ठरलं तर मग' मालिकेत होणार मोठा खुलासा; सुमनने करणार महिपत-नागराजची पोलखोल, पण…

SCROLL FOR NEXT