Accident; बस रिंगडी नदीत कोसळून 4 जणांचा मृत्यू  ANI
देश विदेश

Accident; बस रिंगडी नदीत कोसळून 4 जणांचा मृत्यू

तुरा येथून शिलाँगकडे जाणाऱ्या प्रवाशांनी जात असलेली बस गुरुवारी सकाळी अचानक रिंगडी नदीत पडली

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वृत्तसंस्था : तुरा येथून शिलाँगकडे जाणाऱ्या प्रवाशांनी जात असलेली बस गुरुवारी सकाळी अचानक रिंगडी नदीत पडली आहे. या अपघातामध्ये आतापर्यंत ४ जणांचा मृत्यू झाला आहे. रिंगडी नदी मधील पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे मदत आणि बचाव कार्यात मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण होत होते.

बसमध्ये असलेल्या इतर प्रवाशांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. पोलिसांनी सांगितलेल्या माहितीनुसार, १६ जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याठिकाणी काहींची प्रकृती अजून देखील गंभीर आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी प्रवाशांनी भरलेली बस तुरा या ठिकाणाहून शिलाँगसाठी निघाली होती.

हे देखील पहा-

बस नुकतीच नोंगचरम मधील रिंगडी नदीजवळ पोहोचली होती. जेव्हा ती अनियंत्रितपणे रेलिंग तोडून नदीत पडली. बस नदीत पडताच पलटी झाली आहे. या अपघातात आतापर्यंत ४ जणांचा मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचलेले पूर्व गारो हिल्स पोलीस बसमधील प्रवाशांना बाहेर काढत आहेत.

आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, अपघातामध्ये अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नदीतील पाण्यामुळे मदत आणि बचाव कार्यात मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण होत आहेत. परंतु, पोलीस आणि प्रशासन सर्व प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात व्यस्त आहेत.

ईस्ट गारो हिल्सचे उपायुक्त स्वप्नील टेंबे यांनी दिलेल्या माहितीनुसार की, २ प्रवासी अद्यापही बेपत्ता आहेत, त्यांचा शोध सुरू आहे. आम्हाला आशा आहे की आम्ही त्यांना लवकरच शोधून काढू.

बसमध्ये २१ प्रवासी होते

ईस्ट गारो हिल्स पोलिसांनी दिलेल्या घटनेच्या माहितीनुसार, मेघालय ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशनची बस नदीत पडली आहे. तेव्हा बसमध्ये २१ प्रवासी होते. राजधानीपासून सुमारे १८५ किमी अंतरावर हा अपघात झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच तातडीने बचाव आणि आपत्कालीन सेवांची टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. आणि बचावकार्य अजून देखील सुरू आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : धाराशिवमध्ये जय मल्हार तरुण मंडळाने डीजेला बगल देत पारंपारिक पोतराज नृत्य सादर करत आपल्या बाप्पाची काढली मिरवणूक

Mumbai Bomb Threat: मुंबईवर दहशतवादी हल्ल्याच्या धमकीमागची इनसाइड स्टोरी खतरनाक, सगळेच चक्रावून गेले

Mumbai Best Bus : मुंबईकरांसाठी 'बेस्ट' बातमी! काळाघोडा ते ओशिवरा प्रवास फक्त ५० रुपयांत

Maharashtra Live News Update: उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांनी दिली पूरग्रस्त भागांना भेट

म्हाडाची बंपर लॉटरी, फक्त १५ लाखांत घर; नाशिकच्या प्राईम लोकेशनवर स्वप्नांचं घर मिळणार

SCROLL FOR NEXT