Chennai! 39-year-old cardiac surgeon Dr. Gradlin Roy died of a sudden cardiac arrest while on duty at Savitha Medical College. 
देश विदेश

Cardiac Arrest : धक्कादायक! कार्डिअॅक सर्जनचा कार्डियक अरेस्टने मृत्यू, रूग्णालयातच अचानक डॉक्टर कोसळले

39-year-old cardiac specialist passes away : चेन्नईतील सविता मेडिकल कॉलेजमध्ये कार्डिअॅक सर्जन डॉ. ग्रॅडलिन रॉय यांचे ड्युटीवर असताना कार्डिअॅक अरेस्टमुळे निधन झाले. सीपीआर, स्टेंटिंग, ECMO, इंट्रा-एऑर्टिक बलून पंप यासह तातडीचे उपचार झाले, पण ते निष्फळ ठरले.

Namdeo Kumbhar

  • ३९ वर्षीय कार्डिअॅक सर्जन यांचा ड्युटीवर असतानाच मृत्यू झाला.

  • कार्डियक अरेस्टमुळेमुळे डॉक्टर जमिनीवर कोसळले

  • सीपीआर, स्टेंटिंग, ECMO यांसारखे तातडीचे उपचार केले, पण त्यांचे प्राण वाचवता आले नाहीत.

  • अचानक छातीत वेदना झाल्यानंतर डॉ. रॉय खाली कोसळले व काही क्षणांतच त्यांचे निधन झाले.

Cardiac surgeon dies of heart attack in Chennai hospital : चेन्नईमधील कार्डिअ‍ॅक सर्जनलाच हृदयविकाराने गाठल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रूग्णालयात ड्युटीवर असताना कार्डिअॅक सर्जनला कार्डियक अरेस्टने गाठलं अन् क्षणात होत्याचे नव्हते झाले. अवघ्या ३९ व्या वर्षी कार्डिक सर्जनाने जगाचा निरोप घेतला. या धक्कादायक घटनेनंतर चेन्नईमधील वैद्यकीय क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे. हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झालेल्या ३९ वर्षीय डॉक्टराचे नाव डॉ. ग्रॅडलिन रॉय असे आहे.

अचानक छातीत दुखू लागल्यानंतर अथवा हार्टअटॅक आलेल्या अनेक रूग्णांसाठी देवदूत ठरलेल्या कार्डिअॅक सर्जन डॉ. ग्रॅडलिन रॉय यांचा शेवट हृदयविकाराच्या धक्क्याने झाला. यामुळे चेन्नईमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येतेय. ग्रॅडलिन रॉय हे रूग्णालयात ड्युटीवर होते, त्यावेळी ही दुखद घटना घडली.

ग्रॅडलिन रॉय यांना हार्टअटॅकने गाठले त्यावेळी ते रूग्णालयातच ड्युटीवर होते. रूग्णांची सेवा करत असताना रॉय यांच्या छातीत अचानक कळ आली अन् ते खाली कोसळले. रॉय यांना वाचवण्यासाठी सहकारी डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले, पण त्यांना वाचवण्यात यश आले नाही. रूग्णालयात असल्यामुळे रॉय यांना तात्काळ वैद्यकीय उपचार मिळाले. सीपीआर, स्टेटिंग, इंट्रा-एओर्टिक बलून पंप, ईसीएमओ यासारखे उपचार रॉय यांना तातडीने मिळाले. पण सर्व डॉक्टरांचे प्रयत्न अयशस्वी ठरले, त्यांचा मृत्यू झाला.

डॉ. ग्रॅडलिन रॉय हे चेन्नईमधील सविता मेडिकल कॉलेजमध्ये कन्सल्टंट कार्डिअॅक सर्जन म्हणून काम करत होते. त्यांना हार्टअटॅकने गाठले त्यावेळी रॉय हे कामावरच होते. त्यांच्या जाण्याने चेन्नईमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. रॉय यांनी काही दिवसांपासून स्वतंत्र प्रॅक्टिसही सुरू केलेली. पण कार्डियक अरेस्टने त्यांची प्राणज्योत मालवली. रॉय यांच्या पश्चात पत्नी आणि मुलगा असा परिवार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs AUS : एलिसा हीलीची खेळी ठरली निर्णायक; रोमांचक सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला धूळ चारली

Dahisar Politics: युतीचा करिष्मा! महापालिका निवडणुकीपूर्वीच महायुतीला धक्का,शेकडो भाजप-शिवसेना कार्यकर्त्यांचा मनसेत प्रवेश

Bardhaman Station : पश्चिम बंगालमध्ये रेल्वे स्टेशनवर मोठी दुर्घटना; अनेक प्रवासी जखमी, गर्दीचा धडकी भरवणारा व्हिडिओ समोर

Nilesh Ghaiwal: निलेश घायवळला ब्लू कॉर्नर नोटीस, पुणे पोलिसांनी टाकला मोठा डाव

Japan Declares Flu: ४ हजारांहून अधिक रुग्ण, जपानमध्ये शाळा बंद, रुग्णालये फुल्ल

SCROLL FOR NEXT