24 तासात 385 दहशतवाद्यांचा खात्मा!तालिबान्यांचा राज्यपालही ठार Saam Tv
देश विदेश

24 तासात 385 दहशतवाद्यांचा खात्मा!तालिबान्यांचा राज्यपालही ठार

अफगाणिस्तानात (Afganistan) तालिबानी दहशतवाद्यांशी (Taliban Terrorist) सुरक्षा दलांची भीषण लढाई अनेक आघाड्यांवर सुरू आहे.

वृत्तसंस्था

अफगाणिस्तानात (Afganistan) तालिबानी दहशतवाद्यांशी (Taliban Terrorist) सुरक्षा दलांची भीषण लढाई अनेक आघाड्यांवर सुरू आहे. वृत्तसंस्था एएनआयने अफगाणिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाच्या हवाल्याने म्हटले आहे की, गेल्या 24 तासांत 385 तालिबानी दहशतवादी ठार झाले आहेत आणि 210 जखमी झाले आहेत.

त्याचवेळी, संयुक्त राष्ट्रसंघाच्या सरचिटणीसांच्या विशेष प्रतिनिधी डेबोरा लायन म्हणाल्या, अफगाणिस्तान मधील युद्ध धोकादायक टप्प्यावर पोहोचला आहे. एका वृत्तसंस्थेच्या अहवालानुसार, तालिबानचे दहशतवादी उत्तर अफगाणिस्तानच्या जावाझान प्रांताची राजधानी शेबरघनमध्ये घुसले आहेत. शेबरघनमध्ये अनेक आघाड्यांवर अफगाण सुरक्षा दल आणि तालिबान यांच्यात जोरदार लढाई सुरू आहे.

राजधानी काबीज करण्याचा डाव

माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, तालिबानी दहशतवाद्यांनी शुक्रवारी काबूलमधील एका राज्य माध्यम केंद्राच्या संचालकाची हत्या केली होती. छोट्या प्रशासकीय जिल्ह्यांचा ताबा घेतल्यानंतर तालिबानी दहशतवादी आता प्रांतीय राजधानींवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. या भागात तालिबानी अतिरेक्यांनी शुक्रवारी दक्षिण निमरोज प्रांताची राजधानी झरंज ताब्यात घेतली. त्याच वेळी, सरकार म्हणते की झरंजमध्ये अजूनही अनेक आघाड्यांवर लढाई सुरू आहे. प्रांताचे गव्हर्नर अब्दुल करीम बर्हवी झरंज येथून बुर्जक जिल्ह्यात आश्रय घेण्यासाठी पळून गेले आहेत.

अफगाण संरक्षण मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, गेल्या 24 तासात अफगाण सैन्याने 385 तालिबानी दहशतवाद्यांना ठार केले आहे, 210 जखमी झाले आहेत. तालिबानचा स्वयंभू अब्दुल खलिक नामरूज प्रांतात ठार झाला आहे. झरंज शहरात हल्ल्यादरम्यान अफगाण सैन्याने त्याला ठार केले. येथे रात्री लष्कर आणि तालिबान अतिरेक्यांमध्ये भीषण लढाई झाली. जौझान प्रांतातील शबर्गन शहरात सात दिवसांपासून तीव्र संघर्ष सुरू आहे. येथे तालिबानी दहशतवादी सरकारी इमारतींमध्ये घुसले होते. तालिबानी दहशतवाद्यांनी शेबर्गनमध्ये पूर्ण पकडल्याचा दावा केला आहे. येथे संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे की दहशतवाद्यांना शबर्गनमधून परतवून लावण्यात आले आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bajra Bhakri Recipe: भाकरी थापायला जमत नाही? मग लाटण्याने बनवा मऊ आणि टम्म फुगणारी बाजरीची भाकरी, सोपी आहे पद्धत

Maharashtra Live News Update: मतदान जागृतीसाठी पीएमपीएमएल कडून अनोखे गीत

Dog Killing Case : निवडणुकीतलं आश्वासन पूर्ण करण्यासाठी आठवडाभरात ५०० कुत्र्यांना ठार मारलं, अनेक गावांमध्ये खळबळ

Nail Art : ब्यूटी पार्लरसारखे नेल आर्ट करा आता घरच्या घरी, पाहा डिझाइन

Contrast Saree Blouse : साडीसोबत घाला कॉन्ट्रास्ट रंगाचे ब्लाउज; सणासुदीला मिळेल परफेक्ट लूक, सगळेच म्हणतील WOW

SCROLL FOR NEXT