Fodder Scam News Saam Tv
देश विदेश

Fodder Scam News: चारा घोटाळा प्रकरणात ३५ जणांची निर्दोष सुटका, इतर आरोपींना कोर्टाने काय दिली शिक्षा?

Jharkhand Fodder Scam: सीबीआयच्या विशेष न्यायालयाने (CBI Special Court) आज निकाल जाहीर केला आहे.

Priya More

Jharkhand News: डोरंडा कोषागाराशी संबंधित चारा घोटाळ्याप्रकरणात (Fodder Scam) मोठी अपडेट समोर आली आहे. चारा घोटाळा प्रकरणातील १२४ आरोपींपैकी ३५ जणांची कोर्टाने निर्दोष सुटका केली आहे. तर उर्वरीत आरोपींना कोर्टाने शिक्षा सुनावली आहे. सीबीआयच्या विशेष न्यायालयाने (CBI Special Court) आज निकाल जाहीर केला आहे.

सीबीआयचे विशेष न्यायाधीश विशाल श्रीवास्तव यांच्या कोर्टाने आज चारा घोटाळा प्रकरणी महत्वाचा निर्णय दिला आहे. कोर्टाने दिलेल्या निर्णयानुसार, चारा घोटाळा प्रकरणातील १२५ आरोपींपैकी ३५ आरोपींची निर्दोष सुटका करण्यात आली आहे. तर ५२ आरोपींना तीन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तर ३७ इतर आरोपींनी तीन वर्षांपेक्षा जास्त शिक्षा सुनावण्यात आली आहे. या ३७ आरोपींची रवानगी न्यायालयीन कोठडीमध्ये करण्यात आली आहे. यांच्या शिक्षेवर येत्या १ सप्टेंबर रोजी सुनावणी केली जाणार आहे.

कोर्टाने निर्दोष सुटका केलेल्या आरोपींमध्ये अनुल हक, राजेंद्र पांडे, राम सेवक साहू, दीनानाथ सहाय, साकेत, हरीश खन्ना, कैलाश मणी, कश्यप बारी, बलदेव साहू, सिद्धार्थ कुमार, निर्मला प्रसाद, अनिता कुमारी, एकराम, मो हुसेन, सनौल हक, सायरू निशा, चंचला सिन्हा, ज्योती. कक्कर, सरस्वती देवी, रामावतार सिन्हा, रीमा बडाइक आणि मधु पाठक यांच्या नावांचा समावेश आहे.

बिहारचा चारा घोटाळा संयुक्त बिहारच्या काळात झाला होता. तेव्हा लालूप्रसाद यादव संयुक्त बिहारचे मुख्यमंत्री होते. यादरम्यान डोरंडा तिजोरीतून ३६ कोटी ५९ लाख रुपये बेकायदेशीरपणे काढण्यात आले होते. १९९० ते १९९५ या काळातला हा घोटाळा आहे. या प्रकरणावर गेल्या अनेक वर्षांपासून सुनावणी सुरु होती. या प्रकरणात तब्बल १२५ आरोपी होते. विशेष सीबीआय न्यायालयाचे न्यायाधीश विशाल श्रीवास्तव यांच्या न्यायालयात या प्रकरणावर आज निकाल देण्यात आला आहे.

या २७ वर्षांच्या प्रदीर्घ खटल्यादरम्यान सीबीआयचे विशेष सरकारी वकील रविशंकर यांनी या प्रकरणात एकूण ६१६ साक्षीदारांचे जबाब नोंदवले आहेत. या प्रकरणात तत्कालीन पुरवठादार आणि माजी आमदार गुलशन लाल अस्मानी यांच्यासह १२५ आरोपींवर सध्या खटला सुरू आहे. हा खटला सुरु असताना आतापर्यंत ६२ आरोपींचा मृत्यू झाला. याप्रकरणी सीबीआयने एकूण १९२ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.

चारा घोटाळा प्रकरणात असलेल्या आरोपींमध्ये ३८ लोकसेवक असून त्यापैकी आठ कोषागार अधिकारी आहेत. ८६ पुरवठादार देखील या प्रकरणात आरोपी आहेत. आरोपींमध्ये १६ महिलांचा समावेश आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, ९० वर्षीय ज्येष्ठ तत्कालीन जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. गौरी शंकर प्रसाद यांचाही आरोपींमध्ये समावेश आहे. आरोपींमध्ये १२ हून अधिक असे लोक आहेत ज्यांचे वय ८० वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss 18: 'नींद चुराई मेरी...'अविनाशने शर्टलेस होऊन ईशासोबत केला डान्स, पाहा VIDEO

Maharashtra News Live Updates : प्रकाश आंबेडकर यांच्यावर आज अँजिओप्लास्टी होणार

Rule Change: क्रेडिट कार्ड, LPG पासून ते ट्रेनच्या तिकीटांपर्यंत...; पाहा आजपासून कोणकोणते नियम बदलणार, सामान्यांवर होणार परिणाम!

Mahayuti News : महायुतीत मुख्यमंत्री ठरला? देवेंद्र फडणवीसांच मोठं विधान, पाहा Video

Viral Video: खड्यात गाडी आढळली अन् फटाक्यांचा झाला स्फोट; संपूर्ण घटना CCTV कैद

SCROLL FOR NEXT