Aditya-L1 Mission: चंद्रानंतर आता सूर्य मिशन! आदित्य-L1 2 सप्टेंबरला झेपावणार; इस्रोचं काऊंटडाऊन सुरु

Aditya L1 Launch Date: चंद्रानंतर आता सूर्य मिशन! आदित्य-L1 2 सप्टेंबरला झेपावणार; इस्रोचं काऊंटडाऊन सुरु
Aditya L1 Launch Date
Aditya L1 Launch DateSaam Tv
Published On

Aditya L1 Launch Date: सूर्याचा अभ्यास करण्यासाठी पहिलीच अंतराळ मोहीम इस्रोकडून राबवण्यात येणार आहे. सूर्याच्या अभ्यासासाठी इस्रो 2 सप्टेंबर रोजी आदित्य-L1 प्रक्षेपित करणार आहे. याबाबत माहिती देताना इस्रोने सांगितले की, यासाठी सकाळी 11.50 वाजताची वेळ निश्चित करण्यात आली आहे.

श्रीहरिकोटा येथून याचे प्रक्षेपण केले जाणार आहे. भारताचे आदित्य L1 मिशन सूर्याच्या अदृश्य किरणांचे गूढ आणि त्यावर होणाऱ्या उद्रेकातून निर्माण होणाऱ्या ऊर्जेचं रहस्य जाणून घेण्यास मदत करणार आहे.

सूर्य हा आपल्या सर्वात जवळचा तारा आहे. तार्‍यांच्या अभ्यासात हे आपल्याला सर्वात जास्त मदत करू शकते. यातून मिळालेल्या माहितीमुळे इतर तारे, आपली आकाशगंगा आणि खगोलशास्त्रातील अनेक रहस्ये आणि नियम समजण्यास मदत होईल.   (Latest Marathi News)

या मिशनची सर्व तयारी आता जवळपास पूर्ण झाली असून असून आदित्य एलची असेम्ब्ली आणि इंटिग्रेशन बंगलोरच्या यू.आर. राव सॅटॅलाइट सेंटरमध्ये करण्यात आलीय. सप्टेंबर महिन्यात PSLV रॉकेटच्या माध्यमातून आदित्य एल 1 सूर्याकडे झेपावेल. आदित्य एल 1 हे पृथ्वी आणि सूर्य यांच्यामध्ये पृथ्वीपासून 15 लाख किलोमीटर अंतरावरील हॉलो ऑर्बिट लॉग रेंज पॉईंट 1 या ठिकाणी स्थिरावेल.

Aditya L1 Launch Date
Jio Air Fiber: 'जिओ एअर फायबर'ची प्रतीक्षा संपली, गणेश चतुर्थीला होणार लॉन्च; मुकेश अंबानींनी केली घोषणा

आदित्य एल १ नेमकं कसं आहे?

- आदित्य एल १ चं वजन १४४५ किलो आहे.

- त्यात ७ पे लोड असणार आहेत.

- हे ७ पे लोड सूर्याभोवतीच वातावरण, लहरी, पार्टिकल्स, मॅग्नेटिक फिल्ड डिटेक्टर्स याची माहिती देतील.

- ७ पैकी ४ पे लोड प्रत्यक्ष सूर्याकडे पाहत राहतील.

- उरलेले ३ पे लोड हे सूक्ष्म कण आणि त्या पॉईंट्सवरील वातावरणाचा अभ्यास करतील.

Aditya L1 Launch Date
Public Provident Fund scheme: सरकारी योजना PPF मध्ये गुंतवणूक केल्यास मिळत आहेत सर्वाधिक परतावा, जाणून घ्या संपूर्ण माहिती...

आदित्य एल १ ला अंतराळात ज्या ठिकाणी पाठवलं जाणार आहे. तो पॉईंट किंवा जागा अत्यंत महत्त्वाची आहे. कारण त्या पॉईंटवरून आदित्य एल १ सतत सूर्याचं दर्शन होत राहील. सूर्य आणि एल १ मध्ये कुठलाही अडथळा येणार नाही. त्यामुळे आदित्य एल १ ला विना अडचण सूर्याचं निरीक्षण करता येईल. सूर्याच्या हालचाली, उष्णता, मास इजेक्शन, सूर्याच्या ज्वाळा, अंतराळातील हवामान अशा अनेक शास्त्रीय दृष्ट्या महत्वाच्या माहितीचा अभ्यास करता येणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com