Shocking News  Saam Tv
देश विदेश

Shocking : ३१ वर्षांच्या तरुणाने केली हद्दपार, १००० महिलांसोबत शरीरसंबध, पण आता...; जगभरात होतेय चर्चा

Man Claims Intimacy with 1000 Women: सध्या जगभरामध्ये एका व्यक्तीची जोरदार चर्चा होत आहे. एका तरुणाने तब्बल १००० महिलांसोबत शरीरसंबंध ठेवल्याचे सांगितले. हा तरुण ३१ वर्षांचा आहे.

Priya More

तारुण्यामध्ये प्रत्येक व्यक्तीला वाटते की आयुष्य खूप इन्जॉय करावं, कोणतीही जबाबदारी नसावी आणि कुणाची सक्ती नसावी. पण बऱ्याचदा तारुण्यात केलेली ही मजा आपल्याला धडा शिकवून जाते किंवा त्याचे मोठे तोटे होतात. एका तरुणासोबत असंच काही घडलं आहे. या तरुणाची सध्या सगळीकडे जोरदार चर्चा होत आहे. या तरुणाने जवळपास १००० महिलांसोबत शरीरसंबंध ठेवले. सुरूवातीला त्याला ही लाइफस्टाइल खूपच आवडली पण आता त्याला याचा पश्चाताप होत आहे.

लंडनमधील या तरुणाने नुकताच सांगितले की, त्याचे १००० मुलींसोबत संबंध होते. आता त्याला काही गोष्टींचा पश्चात्ताप होत आहे आणि त्याने इतर लोकांना त्याच्यासारखे न वागण्याचा सल्ला दिला आहे. डेली स्टारच्या वृत्तानुसार, दक्षिण लंडनमधील क्रॉयडन येथे राहणारा ३१ वर्षीय बेनी जेम्सची सध्या चांगली चर्चा होत आहे. बेनीने सांगितले की, त्यांने १० वर्षांहून अधिक काळ दर आठवड्याला वेगळ्या वेगळ्या महिलांसोबत शरीरसंबंध ठेवले होते. पण आता त्याला असे का केले याचा पश्चात्ताप होतो. बेनीने असंही सांगितले की, 'असे केल्यामुळे तुम्हाला पश्चातापाशिवाय काहीही मिळत नाही. नंतर सामान्य जीवन जगणे खूपच कठीण होऊन जाते. यामुळे फक्त एकटेपणा आणि नैराश्य येते.'

बेनीने १००० हून अधिक महिलांशी शरीरसंबंध ठेवल्याचा दावा केला. त्याने सध्यात चर्चेत असलेल्या बोनी ब्लूला सल्ला दिला आहे की ती मोठी चूक करत आहे. बोनी ब्लू एक मॉडेल आहे आणि तिने म्हटले आहे की, ती १००० लोकांशी संबंध ठेवण्याचा विक्रम करेल. बेनी जेम्सचा असा विश्वास आहे की, लोकप्रियतेचा आणि पैसे कमविण्याची लालसा आपल्या भविष्यात येणाऱ्या अंधाराची भरपाई करू शकत नाही.

बेनी जेम्स एक कंटेंट क्रिएटर आहे. १० वर्षांपासून तो दर आठवड्याला असंख्य अनोळखी महिलांसोबत रोमान्स करत होता आणि शरीरसंबंध ठेवत होता. त्याने हा १० वर्षांचा कालावधी मज्जा करण्यातच घालवला. तो ट्विटर आणि इन्स्टाग्राम डीएमद्वारे महिलांशी संपर्क साधत राहिला आणि आठवड्यातून चार वेळा क्लबमध्ये जाऊन वेगवेगळ्या मुलींना भेटत होता. बेनी म्हणाला की, त्यावेळी त्याने ते फक्त जीवन जगणे आणि थोडी मजा करणे म्हणून केले.

पण आता मागे वळून पाहताना बेनी कबूल करतो की त्याचा मार्ग चुकीचा होता. आयुष्यात मजा मस्ती करण्याच्या नादात तो एकटेपणाचे आयु्ष्य जगू लागले. तो चिंता आणि नैराश्याशी झुंजत होता. तो घरातून बाहेर पडायचा नाही. त्याला व्यसन देखील लागले होते. आपला घसरणारा आत्मविश्वास टिकवून ठेवण्यासाठी तो ड्रग्ज आणि दारू पित होता. पण बेनीला आता एक चांगली लाइफपार्टनर मिळाली आहे. त्याने आता मद्यपानही सोडले आहे. लॉकडाऊन दरम्यान बहुतेक वेळ एकटे राहिल्यानंतर त्याने नवीन आयुष्या सुरू करण्याचा निर्णय घेतला.

बेनी म्हणाला की, त्याला बोनी ब्लूमध्ये त्याच्या जुन्या रुपाची झलक दिसते. बेनीने तिला विनंती केली की, ती सर्वात खालच्या पातळीवर पोहोचण्यापूर्वी ही जीवनशैली सोडून दे. जसे त्याने केले तसं तू वागू नको. बेनीने पुढे सांगितले की, तो एकदा ईस्टएंडर्स स्टार डॅनिएला वेस्टब्रुकला डेट करत होता. त्याने कबूल केले की, मी कदाचित त्यावेळी तिचा बोनी ब्लूचा मेल वर्जन होतो. मी तिला भविष्याबद्दल विचार करायला सांगेन. १० वर्षांनंतर याचा तुमच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर काय परिणाम होईल याचा विचार कर. या लाइफस्टाइलमुळे फक्त एकटेपणा आणि नैराश्य येईल, असे तो बोनी ब्लूला सांगतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yogesh Kadam : आधी पुण्यातील गुन्हेगारीचा आलेख वाचला; नंतर गृहराज्यमंत्र्यांनी गुन्हे रोखण्याचा सरकारचा 'राणबाण उपाय'च सांगितला

Akola Shocking : दिवसभर ५ वर्षांचा चिमुकला बेपत्ता, नंतर सांडपाण्याकडे लक्ष गेलं; दृश्य पाहून कुटुंब हादरलं

Raj Thackeray : महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री हिंदीसाठी का भांडतोय? राज ठाकरेंचा थेट सवाल

Raj Thackeray : 'मुंबईतल्या समुद्रात डुबे डुबे के मारेंगे'; राज ठाकरेंची भाजप खासदार निशिकांत दुबेंना वार्निंग

Ganapati Special Trains : चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी, गणेशोत्सवानिमित्ताने मध्य रेल्वे चालवणार २५० विशेष गाड्या

SCROLL FOR NEXT