Crime  Saam Tv
देश विदेश

महिलेवर ३ आरोपींकडून ३ वेगवेगळ्या ठिकाणी बलात्कार, पीडितेला बेशुद्ध अवस्थेत सोडून आरोपी फरार

एकाच महिलेवर तीन वेगवेगळ्या ठिकाणी, 3 वेगवेगळ्या पुरुषांनी 3 वेळा बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

लखनऊ : एकाच महिलेवर तीन वेगवेगळ्या ठिकाणी, 3 वेगवेगळ्या पुरुषांनी 3 वेळा बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी तिघांपैकी एक 25 वर्षीय शबाब आलम (Shabab Alam) या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.

लखनौच्या हजरतगंज पोलीस स्टेशनच्या परिसरात एक महिला बेशुद्ध अवस्थेत आढळून आल्याची माहिती मिळली असता पोलिसांनी तिला रुग्णालयात दाखल केले आणि डॉक्टरांच्या तपासातून या महिलेवरती बलात्कार झाल्याचं निष्पन्न झालं.

शिवाय याबाबत पोलिसांनी चौकशी केली असता या महिलेवर ३ वेगवेगळ्या ठिकाणी ३ वेगवेगळ्या लोकांनी बलात्कार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शबाब आलम नावाच्या आरोपीने आधी या महिलेवर बलात्कार करून तिला चारबागजवळ सोडून दिले. त्यानंतर तिला सोडून दिलेल्या ठिकाणी दुसऱ्या एका आरोपीने तिच्यावर बलात्कार करुन तिला आहे त्याच स्थितीत सोडून दिलं.

पोलिसांना परिवर्तन चौकात एक महिला बेशुद्ध अवस्थेत आढळल्याची माहिती दिल्यानंतर हजरतगंज पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन पीडितेला क्वीन मेरी हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले असता तिच्यावर बलात्कार झाल्याचं समोर आलं.

याप्रकरणी पोलिसांनी सामुहिक बलात्काराचा गुन्हा दाखल केला असून ते अधिकचा तपास करत आहेत. या प्रकरणातील एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. मात्र २ संशयीत आपोपींना अटक केलेली नसल्याचं हजरतगंज पोलिस स्टेशनचे स्टेशन हाउस ऑफिसर (SHO) श्याम बाबू शुक्ला यांनी सांगितले.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या जनता दरबात हजारो नागरिक आणि शेतकऱ्यांची गर्दी..

ज्या बापाने बोट धरून चालायला शिकवलं, त्याच्याच अंत्यविधीसाठी मुलाला वेळ नाही; महाराष्ट्रात मन हेलावून टाकणारी घटना

5 Things You Should Never Give to Others: या 5 गोष्टी चुकूनही दुसऱ्याला देऊ नका

5 Gram Gold Mangalsutra: 5 ग्रॅम सोन्यामध्ये महिलांसाठी सुंदर मंगळसूत्र; पाहा लेटेस्ट 5 डिझाइन्स

मुंबईच्या ५ स्टार हॉटेलमध्ये जेवायला गेले अन् ताटात काय दिसलं? प्रसिद्ध डॉक्टरांचा थेट तुकाराम मुंढेंकडे संताप

SCROLL FOR NEXT