कुचिक प्रकरणातील मुलीला गर्भपातासाठी 4 ठिकाणी नेले; चित्रा वाघ यांची माहिती

संबंधीत मुलगी तिच्या वडीलांसोबत नसून ती गायब आहे अशी माहिती चित्रा वाघ यांनी दिली आहे.
Chitra Wagh- Raghunath Kuchik
Chitra Wagh- Raghunath KuchikSaam TV
Published On

पुणे: पुण्यात शिवसेना नेते रघुनाथ कुचिक यांच्यावर बलात्काराचे आरोप झाले आहेत. त्या प्रकरणात त्यांना जामीनही मंजूर झाला आहे. संबंधीत मुलीने फेसबुक लाईव्ह करत आत्महत्या करण्याचाही प्रयत्न केला होता. भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी आज पत्रकार परिषद घेत अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. मला मुलीच्या घातपाताची शक्यता वाटत आहे. पीडित मुलीचे काल लोकेशन इस्लामपूर होते. आज पणजी दिसत आहे. जेव्हा मुलीची भेट घेतली तेव्हा कुठे राहशील तेव्हा ती गोवा नको म्हणाली होती कारण गोव्यात रघुनाथ कुचिक (Raghunath Kuchik) यांचं साम्राज्य असल्याचे चित्रा वाघ म्हणाल्या.

संबंधीत मुलगी तिच्या वडीलांसोबत नसून ती गायब आहे अशी माहिती चित्रा वाघ यांनी दिली आहे. 4 ठिकाणी तिला गर्भपातासाठी नेण्यात आल्याची माहितीही चित्रा वाघ यांनी दिली. ज्या हॉस्पिटलमध्ये तिला नेण्यात आले होते त्या हॉस्पिटलची अद्याप चौकशी झालेली नाही. मदत तर कोणी केली नाही पण दिशाभूल करायचं काम सुरु असल्याची टीका चित्रा वाघ यांनी केली आहे. आपल्याकडे अनेक हेल्पलाईन नंबर बनवण्यात आले आहेत. निर्भया पथक, दामिनी इतकं सगळं काढून ठेवलंय कशासाठी? असा सवाल देखील विचारला आहे.

Chitra Wagh- Raghunath Kuchik
वक्फ बोर्डच्या 409 एक्कर जमीन घोटाळा प्रकरणात, तीन आरोपींचं आत्मसमर्पण

दरम्यान काल पुण्यात एक मुलीवरती एकतर्फी प्रेमातून तरुणाने हल्ला केला होता. त्या हल्लाप्रकरणावरती चित्रा वाघ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. रुबी हॉलचे बिल शासनाने द्या नाहीतर शाळेने द्या या शाळेची मान्यता चेक करा असे चित्रा वाघ म्हणाल्या आहेत. बलात्काऱ्यांच्या पिलावळलीला वाचवण्यात पुणे पोलीस आयुक्त फार बिझी असल्याचा आरोप चित्रा वाघ यांनी केला आहे.

पुणे पोलिसांची भूमिका संशयास्पद असते. मागच्या वेळी संजय राठोड आणि आता रघुनाथ कुचिक. पोलिसांनी जी शपथ घेतली त्या नुसार काम करायचं असतं असा टोला चित्रा वाघ यांनी पुणे पोलिसांना लगावला आहे. काही करा आणि पुण्यात येऊन रहा असं झालंय, इथे बलात्कारार्यांना संरक्षण मिळते असेही वाघ म्हणाल्या.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com