Corona In India, Corona News Updates in Marathi  Saam Tv
देश विदेश

पुन्हा वाढतोय धोका! देशात गेल्या 24 तासांत 2,927 नवे कोरोनाबाधित, 32 मृत्यू

देशात कोरोनाचा संसर्ग सध्या मोठ्या प्रमाणात वाढताना पाहायला मिळत आहे

वृत्तसंस्था

वृत्तसंस्था: देशात कोरोनाचा संसर्ग सध्या मोठ्या प्रमाणात वाढताना पाहायला मिळत आहे. देशात गेल्या २४ तासांत २९२७ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे, तर ३२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच मंगळवारी दिवसभरात २२५१ रुग्णांनी कोरोनावर (corona) मात केली आहे. देशात सक्रिय रुग्णांची संख्या १६ हजार २७९ झाली आहे. काल २४८३ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. (Corona News Updates)

हे देखील पाहा-

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात सक्रिय रुग्णांची संख्या १६ हजार २७९ इतकी झाली आहे. मंगळवारी दिवसभरामध्ये देशात २२५१ रुग्ण कोरोनामुक्त (corona) झाले आहेत. भारतात कोरोनामुळे जीव गमावणाऱ्यांची संख्या ५ लाख २३ हजार ६५४ इतकी झाली आहे. देशामध्ये आतापर्यंत ४ कोटी २५ लाख २५ हजार ५६३ रुग्ण कोरोना (corona) विषाणूच्या संसर्गातून बरे झाले आहेत.

याबरोबरच देशात सध्याचा दैनंदिन कोरोना संसर्गाचा दर ०.०४ टक्क्यांवर पोहोचला आहे. आतापर्यंत देशव्यापी लसीकरणात १८८ कोटीपेक्षा जास्त कोरोना प्रतिबंधात्मक लसी देण्यात आल्या आहेत. मंगळवारी दिवसभरात देशात २१ लाख ९७ हजार ८२ कोरोना लसी देण्यात आल्या आहेत. भारतात आतापर्यंत १८८ कोटी १९ लाख ४० हजार ९७१ कोरोनाच्या लसी देण्यात आल्या आहेत.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Aloe Vera Juice: घरी कोरफडचा रस कसा बनवायचा? सोपी आहे पद्धत

Pune Traffic Update : पुणेकरांनो लक्ष द्या! आज वाहतुकीत मोठे बदल, 'हे' आहेत पर्यायी मार्ग

Maharashtra Live News Update : पुणेकरांवरील 5 टक्क्यांवरील करवाढ रद्द

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींच्या रखडलेल्या हप्त्याबाबत सरकारच्या हालचाली;₹१५००बाबत मोठी अपडेट समोर

Social Media Ban: अल्पवयीन मुलांना सोशल मीडियावर बंदी? केंद्र सरकार घेणार मोठा निर्णय?

SCROLL FOR NEXT