Indian Woman killed in US Saam Tv
देश विदेश

Crime: अमेरिकेत भारतीय तरुणीची हत्या, एक्स बॉयफ्रेंडच्या घरात सापडला मृतदेह; शरीरावर चाकूचे अनेक वार

Indian Woman killed in US: अमेरिकेत भारतीय तरुणीची हत्या करण्यात आल्याची घटना घडली. या तरुणीच्या एक्स बॉयफ्रेंडने हे भयंकर कृत्य केले. तरुणाच्या घरामध्ये रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अवस्थेत तरुणीचा मृतदेह सापडला.

Priya More

Summary:

  • अमेरिकेत २७ वर्षीय भारतीय तरुणीची निर्घृण हत्या

  • एक्स बॉयफ्रेंडच्या घरात रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह सापडला

  • हत्या केल्यानंतर आरोपी भारतात पळून गेल्याचा संशय

  • अमेरिकन पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू

अमेरिकेमध्ये २७ वर्षीय भारतीय तरुणीची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. ही २७ वर्षीय तरुणी मागच्या आठवड्यात अमेरिकेच्या मैरीलँड येथून बेपत्ता झाली होती. या तरुणीचा मृतदेह तिच्या एक्स बॉयफ्रेंडच्या घरी सापडला. एक्स बॉयफ्रेंडनेच तिची हत्या केल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. आरोपी भारतात पळून गेला. या प्रकरणी अमेरिकन पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, निकीता गोदिशाला असं हत्या झालेल्या तरुणीचे नाव होते. ती अमेरिकेच्या मैरीलँड येथील एलिसॉट सिटीमध्ये राहत होती. निकिताचा मृतदेह तिच्या एक्स बॉयफ्रेंडच्या घरामध्ये रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अवस्थेत सापडला. निकिताच्या शरिरावर चाकूने अनेक वेळा वार करण्यात आले होते. अर्जुन शर्मा असं तिच्या एक्स बॉयफ्रेंडचे नाव आहे. निकिताची हत्या केल्यानंतर अर्जुनने स्वत: पोलिस ठाण्यात जाऊन ती गायब असल्याची तक्रार दाखल केली होती. २ जानेवारीला तक्रार दिल्यानंतर अर्जुन गायब झाला.

निकिताची हत्या करून अर्जुन भारतामध्ये पळून गेला. त्याला अटक करण्यासाठी पोलिसांनी वॉरंट जारी केले आहे. अर्जुन शर्माने पोलिसांना सांगितले होते की, निकिताला शेवटचे ३१ डिसेंबरला मैरीलँड येथील तिच्या अपार्टमेंटमध्ये पाहिल होते. त्यानंतर ३ जानेवारीला पोलिसांनी अर्जुनच्या घराची तपासणी केली तेव्हा त्यांना निकिताचा मृतदेह आढळून आला. तिच्या शरीरावर अनेक वेळा वार करण्यात आले होते.

पोलिसांनी असा अंदाज वर्तवला आहे की, निकिताची हत्या केल्यानंतर अर्जुन शर्मा भारतामध्ये पळून गेला. तो जेव्हा पोलिस ठाण्यात आला होता तेव्हा त्याने अमेरिका सोडण्याचा प्लान केल्याचे सांगितले होते. पोलिसांचे म्हणणे आहे की, निकिताची हत्या ३१ डिसेंबरला रात्री ७ वाजता करण्यात आली होती. तिचा मृतदेह ३ जानेवारीला सापडला. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. भारतीय दुतावासाने सांगिीतले की, निकिताच्या कुटुंबीयांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Local: प्रवासी लोकलखाली आल्याने पश्चिम रेल्वेचे वाहतूक विस्कळीत; पाहा VIDEO

Trisha Krishnan: त्रिशा कृष्णनची राजकारणात एन्ट्री? पोटनिवडणूक लढवण्याची शक्यता

नंदूरबारमध्ये अग्नितांडव! नवापूर MIDC मध्ये कंपनीला भीषण आग, एकापोठापाठ ५ स्फोटामुळे परिसर हादरला

Maharashtra News Live Update: नालासोपारात गटारावरील जाळीत महिलेचा पाय अडकला

Kasara-Manmad Railway: पाच तालुके अन् ४५ गावातून धावणार कसारा-मनमाड रेल्वे; नाशिक-मुंबई प्रवास होणार जलद

SCROLL FOR NEXT