26/11 Mumbai file photo
26/11 Mumbai file photo Saam Tv
देश विदेश

Pakistan News: 26/11 च्या दहशतवाद्याचा पाकिस्तानी तुरुंगात मृत्यू, अतेरिकी हल्ल्यात होता मोठा वाटा

Vishal Gangurde

Pakistan News: लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेशी संबंधित हाफीज अब्दुल सलाम भुट्टावी याचा पाकिस्तानातील तुरुंगात हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. भुट्टावीने २००८ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यासाठी दहशतवाद्यांना तयार करण्यासाठी मदत केली होती. तो टेरर फंडिंग प्रकरणी पाकिस्तानच्या तुरुंगात साडे १६ वर्षांची शिक्षा भोगत होता. (Latest Marathi News)

भुट्टावीच्या मृत्यूची घोषणा अनेक संघटनांनी केली होती. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने अब्दुल सलाम भुट्टावीला दहशतवादी म्हणून घोषित केले होते. भुट्टावीला पाकिस्तानने टेरर फंडिंग प्रकरणात अटक केली होती.

अब्दुल रहमान मक्की यांच्यासोबत भुट्टावीला पाकिस्तानने बेड्या ठोकल्या होत्या. पाकिस्तानने दहशतवादी टेरर फंडिंग प्रकरणात अटक केली होती. या भुट्टावीला ऑगस्ट २०२० मध्ये साडे सोळा वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. तेव्हापासून भुट्टावी तुरुंगात शिक्षा भोगत होता.

लष्कर-ए-तैयबाचा संस्थापक हाफिज सईद याला 2002 आणि 2008 मध्ये पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर भुट्टावीने एलईटीचा कार्यकारी प्रमुख म्हणून काम केले होते. सोमवारी रात्री उशिरा भुट्टावीच्या मृत्यूची घोषणा करण्यात आली.

पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील शेखपुरा तुरुंगात सोमवारी हृदयविकाराच्या झटक्याने भुट्टावी याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. लष्करशी संबंधित एका संघटनेने 78 वर्षीय दहशतवादी भुट्टवी याच्या अंत्यसंस्काराचा व्हिडिओही जारी केला आहे.

भारतातील गुप्तचर अधिकाऱ्यांनी दहशतवादी भुट्टावीच्या मृत्यूला दुजोरा दिला आहे. लष्कर-ए-तैयबाच्या दहशतवाद्यांनी मुंबईत अनेक ठिकाणी दहशतवादी हल्ले केले आहेत. या हल्ल्यात मेरिका आणि इस्रायलसारख्या अनेक देशांच्या नागरिकांसह एकूण 166 लोक मारले गेले. तर अनेक जण जखमी देखील झाले. पाकिस्तानने या हल्ल्यांप्रकरणी ऑपरेशन कमांडर झकीउर रहमान लख्वीसह लष्कर-ए-तैयबाच्या ७ जणांना अटकही केली होती.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Leg Pain: रात्री झोपताना पाय दुखतात? 'या' उपायांनी होईल फायदा

Sanjay Raut: महाविकास आघाडी राज्यात किती जागा जिंकणार? संजय राऊतांनी आकडाच सांगितला!

Pre-Wedding Shoot : उन्हाळ्यात प्री वेडिंग शूट करताना 'ही' काळजी घ्या

Tur Dal Rate Update: तुरडाळ महागली! जाणून घ्या नवे दर

Hardik Pandya Statement: मुंबईच्या पराभवाला हार्दिकने या खेळाडूला ठरवलं कारणीभूत! म्हणाला...

SCROLL FOR NEXT